डाॅल्बी, डीजेसाठी अांदाेलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 04:26 PM2018-09-16T16:26:29+5:302018-09-16T16:28:02+5:30
विसर्जन मिरवणूकीत डीजे वाजविण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याने या निर्णयाविराेधात पुण्यातील सार्वजनिक गणशाेत्सव समिती अाणि डाॅल्बी, डीजे व्यावसायिक रस्त्यावर उतरले हाेते.
पुणे : उच्च न्यायालयाने मिरवणूकीमध्ये तसेच इतर ठिकाणी डाॅल्बी, डीजे वाजविण्यास बंदी घातली असल्याने या निर्णयाविराेधात पुण्यातील सार्वजनिक गणशाेत्सव समिती अाणि डाॅल्बी, डीजे व्यावसायिकांनी अाज रस्त्यावर उतरुन अांदाेलन केले. हिंदू सण साजरे करतानाच अशा प्रकारची बंदी का घातली जाते, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात अाला.
उच्च न्यायालयाने डाॅल्बी, डीजेवर बंदीचा अादेश दिला अाहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शहरातील गणेश मंडळे अाणि डाॅल्बी, डीजे व्यावसायिकांनी बालगंधर्व चाैकात अांदाेलन केले. या अादेशामुळे हजाराे तरुण व्यावसायिकांवर उपासमारिची वेळ अाली असल्याचे व्यवासायिकांचे म्हणणे अाहे. तसेच डॉल्बी, डीजे सॉउंड सिस्टिम व्यावसायिक, गणेश मंडळे यापैकी कोणचीही बाजू समजून न घेता उच्च न्यायालयाने डॉल्बी, डीजेवर बंदीचा आदेश दिला असल्याची नाराजी सुद्दा व्यावसायिकांनी यावेळी व्यक्त केली.
पुणे शहरात दोन ते अडीच हजार मराठी तरुण डॉल्बी, डीजेचा व्यावसाय करतात. डॉल्बी, डीजेवर बंदी घालण्याबाबत या व्यावसायीकांशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय देणे चुकीचे आहे. या निर्णयामुळे हजारो मराठी तरुणांवर उपासमारिची वेळ येणार आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत या प्रश्नावर तोडगा काढावा, असे समितीचे प्रविण डोंगरे यांनी सांगितले.
दरम्यान, काही मंडळांनी अॅडव्हान्स देऊन डीजे सिस्टिम बूक केल्या अाहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे डीजे वाजवायचा की नाही यात संभ्रम अाहे. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते अाणि डीजे व्यावसायिक यांच्यात वाद हाेत असल्याचे चित्र अाहे.