समन्स अखेर राहुल गांधी यांच्या घरी; स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 10:51 AM2024-11-18T10:51:51+5:302024-11-18T10:55:09+5:30

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयात हजर होण्याबाबत यापूर्वी बजावलेले समन्स ...

Summons finally at Rahul Gandhi's house; Today, the hearing of Swatantraveer Savarkar defamation case | समन्स अखेर राहुल गांधी यांच्या घरी; स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी आज सुनावणी

समन्स अखेर राहुल गांधी यांच्या घरी; स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी आज सुनावणी

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयात हजर होण्याबाबत यापूर्वी बजावलेले समन्स तीस हजारी जिल्हा न्यायालयाऐवजी पतियाळा हाउस न्यायालयात गेल्याने पुन्हा पुण्याच्या विशेष न्यायालयात परत आले होते. त्यामुळे गांधी यांना विशेष न्यायालयाकडून पुन्हा समन्स बजावण्यात आले. अखेर हे समन्स त्यांच्या घरी पोचले आहेत.

दरम्यान, या दाव्याची सुनावणी आजी-माजी खासदार- आमदारांविरोधात खटले चालविणाऱ्या विशेष न्यायालयात होत आहे. त्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना हाजीर होण्याचे समन्स बजावले आहेत. या प्रकरणी आज (दि. १८) सुनावणी होणार आहे. समन्स मिळाल्याने आता सुनावणीसाठी राहुल गांधी उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात न्यायालयात हजर होण्याबाबत गांधी यांना बजावलेले समन्स चुकीच्या न्यायालयात गेल्याने परत आले होते. हे समन्स दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयात गेले आहेत. मात्र, राहुल गांधी यांचे निवासस्थान तीस हजारी जिल्हा न्यायालयाच्या हद्दीत असल्याने समन्स बजावण्याची कार्यवाही त्यांच्याकडून करण्यात केली जाणार होती. नव्याने पाठवलेले समन्स गांधी यांची घरी पोचले असून ते त्यांनी स्वीकारले देखील आहे.

  ... तर अटक वॉरंट

दाव्याच्या सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत राहुल गांधी यांना बजावलेले समन्स त्यांच्या घरी पोचले आहे. त्याबाबतचा टपाल विभागाचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. समन्स मिळाल्यानंतरही गांधी गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघू शकतो.
- अॅड. संग्राम कोल्हटकर, सात्यकी सावरकर यांचे वकील    

Web Title: Summons finally at Rahul Gandhi's house; Today, the hearing of Swatantraveer Savarkar defamation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.