सातव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये उरणच्या तीन स्पर्धकांनी केली ९ सुवर्ण पदकांची कमाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 07:56 PM2022-09-19T19:56:15+5:302022-09-19T19:57:14+5:30

सातव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये उरणच्या तीन स्पर्धकांनी ९ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. 

3 competitors from Uran have won 9 gold medals in the 7th National Swimming Championships  | सातव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये उरणच्या तीन स्पर्धकांनी केली ९ सुवर्ण पदकांची कमाई 

सातव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये उरणच्या तीन स्पर्धकांनी केली ९ सुवर्ण पदकांची कमाई 

Next

मधुकर ठाकूर

उरण (रायगड: इंदौर-मध्यप्रदेश येथे झालेल्या ७ व्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उरणच्या हितेश जगन्नाथ भोईर, आर्यन विरेश मोडखरकर आणि जयदीप सिंग या तिन्ही स्पर्धकांनी विविध वयोगटातील जलतरण स्पर्धांमधून ९ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. संयुक्त भारतीय खेल फाउंडेशनच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील इंदौर येथे ७ व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात आले होते. 

१७ ते १९ सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये अथलेटिक्स, जलतरण, व्हॉलीबॉल, कबड्डी, तायक्वांदो, कराटे, मार्शल आर्ट, डाँसिंग, योगा, चेस, कॅरम, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेबलटेनिस, स्केटिंग, लॉन टेनिस, धनुर्विद्या, हॅन्डबॉल, बॉक्सिंग, रेसीलिंग, पायावर लिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित विविध जलतरण स्पर्धामध्ये उरणमधील हितेश जगन्नाथ भोईर, आर्यन विरेश मोडखरकर आणि जयदीप सिंग यांनी सहभाग घेतला होता. गोल्डन इंटरनॅशनल स्कुलच्या जलतरण तलावामध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये आर्यन मोडखरकर याने अंडर- १७ वयोगटातील ५० मीटर बटरफ्लाय स्ट्रोक, ५० मीटर फ्रिस्टाईल आणि १०० मीटर फ्रिस्टाईल या तीन स्पर्धा खेळून तीनही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. 

हितेश भोईर यानेही अंडर-१९ वयोगटातील ५० मीटर फ्रिस्टाईल, १०० मीटर फ्रिस्टाईल आणि १०० मीटर बॅक्स्ट्रोक या प्रकारांमध्ये तीन सुवर्ण पदक पटकाविली आहेत.तर जयदीप सिंगनेही अंडर ३० + वयोगटातील ५० मीटर फ्रिस्टाईल, ५० ब्रेस्टस्ट्रोक, १०० ब्रेस्टस्ट्रोक या तीन प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. यामुळे उरणच्या या तीन स्पर्धकांचे राष्ट्रीय स्पर्धेमधील जलतरण स्पर्धेवर उरणच्या स्पर्धकांचे  वर्चस्व राहिले आहे. उरणच्या या तीन स्पर्धकांनी विविध वयोगटातील स्पर्धेत सहभागी होऊन एकूण ९ सुवर्ण पदकांची लयलूट केल्याने या स्पर्धकांचे परिसरातील क्रीडाप्रेमी, नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

 

Web Title: 3 competitors from Uran have won 9 gold medals in the 7th National Swimming Championships 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.