इकोफ्रेंडली साहित्याने सजल्या बाजारपेठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 02:40 AM2018-09-12T02:40:41+5:302018-09-12T02:41:01+5:30

गणपतीची आरास, मखर व सजावटीच्या साहित्याने सध्या सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा सजल्या आहेत.

Decorated table with eco-friendly material | इकोफ्रेंडली साहित्याने सजल्या बाजारपेठा

इकोफ्रेंडली साहित्याने सजल्या बाजारपेठा

Next

राबगाव/पाली : गणपतीची आरास, मखर व सजावटीच्या साहित्याने सध्या सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा सजल्या आहेत. थर्माकोल, प्लॅस्टिकच्या सजावटीला बंदी घालण्यात आल्याने इकोफ्रेंडली कागदी, कापडी मखरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कारागिरांकडून पर्यावरणपूरक आरास बनविण्यात येत असून, पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात इकोफ्रेंडली कापडी मखरांना मोठी पसंती व मागणी असल्याचे दिसून येत आहे.
प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीच्या निर्णयामुळे इकोफ्रेंडली वस्तूंना मागणी वाढली आहे. सजावटीचे साहित्यविक्रेते विलास शिंदे यांनी थर्माकोलच्या मखरांना पर्याय देण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी कापडी मखर बनविली आहेत. या मखरांना स्थानिक भक्तांसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी व खेडमधील भक्तांकडूनही पसंती मिळत आहे. यंदा शिंदे यांनी जवळपास २०० कापडी मखर बनविली असून, निम्म्याहून अधिक कापडी मखरांची बुकिंग झाली आहे. सोलापूरमधील गणेशभक्तांनाही शिंदे यांच्या नेत्रदीपक कापडी आरासची भुरळ पडली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. इकोफ्रेंडली मखर सुंदर व दर्जेदार असल्याची प्रतिक्रिया ग्राहक संजय म्हात्रे यांनी दिली.
>खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
पेण : बाप्पाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या साहित्यखरेदीसाठी पेणची बाजारपेठ गर्दीने फुलली आहे. पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, कपडे, अगरबत्ती, प्रसादासाठी मोदक, लाडू, मिठाई, मध, तूप, दही, दूध, फ ळे, फुले, इमिटेशन ज्वेलरी, कपडे, किराणा माल, तसेच इलेक्ट्रिकल उपकरणे खरेदीसाठी सगळ्याच दुकानांत गर्दी उसळली आहे.
>चाकरमान्यांचे मुरु ड तालुक्यात आगमन
आगरदांडा : मुरु ड तालुक्यात मुंबई, ठाणे, बोरीवली, भाइंदर, विरार व पनवेल येथील चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, गणपतीची आरास करण्यात मग्न झाले आहेत. कामानिमित्त शहरांमध्ये स्थायिक झालेले चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने दाखल होतात. ज्या कारखान्यात गणपतीची मूर्ती बनवण्यास दिली जाते, त्याकारखान्यात भक्तांकडून रंगीबेरंगी आकर्षक खडे, मोती, मुकूट आदी मूर्तीच्या सजावटीचे साहित्य दिले जाते. त्यानंतर गणेशचतुर्थीला वाजतगाजत जल्लोषात गणरायांचे आगमन होते.
>शाडूच्या मूर्तींना भक्तांकडून पसंती
आगरदांडा : मुरु ड तालुक्यातील मूर्तिशाळांमध्ये गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. तालुक्यात शाडूच्या मूर्ती मोठ्या संख्येने बनवल्या जातात. शाडूच्या मूर्तीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही, नागरिकांमध्ये जनजागृती होत असल्याने पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी वाढल्याचे मूर्तिशाळेचे मालक अच्युत चव्हाण सांगतात. कारागिरांची मजुरी वाढल्याने मूर्तींच्या किमतीत ५० ते १०० रुपयांनी वाढ झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
>रेवदंड्याची बाजारपेठ पूजेच्या साहित्याने सजली
रेवदंडा : अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून रेवदंड्यातील बाजारपेठ पूजेच्या साहित्याने सजली आहे. उत्सवासाठी लागणाºया विविध साहित्याची आवक वाढली असली भडकलेल्या महागाईमुळे हव्या त्या प्रमाणात ग्राहक दिसत नाहीत.
दहा रुपयांपासून ते ५०० रु पयांपर्यंत बाजारात सुवासिक अगरबत्या विक्र ीसाठी दिसत आहेत. गणेशपूजेला लागणाºया धुपाची किंमत किलोला २00 ते ६00 रुपये आहे. कापराचे भाव तर यावर्षी गगनाला भिडलेले दिसत असून, डब्यापेक्षा पाकिटांना मागणी दिसत आहे.
निरंजनाच्या किमती ५0 रुपयांपासून पुढे आहेत. धूपआरतीची भांडी, रंगीबेरंगी कंठ्या बाजारात दाखल असून, गणपतीसमोर मांडायला लागणारी कवंडाळे व पिग्वी आदिवासी महिला विक्र ीला घेऊन आलेल्या दिसत आहेत. विविध ज्वेलरी दुकानात दूर्वांची माळ, पान-सुपारी, जास्वंदाची फुले, मोदक आदी वस्तू विक्र ीला दिसत आहेत.

Web Title: Decorated table with eco-friendly material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.