राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत गेलात का? अजित पवार यांचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:19 AM2018-01-09T02:19:16+5:302018-01-09T02:19:20+5:30
जनतेला अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखविणारे सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार असून त्यांच्याच पक्षातले आमदार आज त्यांच्यावर नाराज आहेत. सर्व ठिकाणी हुकूमशाही करीत मीडियालासुद्धा आवर घालण्याचे सुरू असलेले प्रकार अक्षरश: लोकशाहीचाही आवाज दाबण्याचे काम हे सरकार करीत आहे.
धाटाव : जनतेला अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखविणारे सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार असून त्यांच्याच पक्षातले आमदार आज त्यांच्यावर नाराज आहेत. सर्व ठिकाणी हुकूमशाही करीत मीडियालासुद्धा आवर घालण्याचे सुरू असलेले प्रकार अक्षरश: लोकशाहीचाही आवाज दाबण्याचे काम हे सरकार करीत आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात राज्य सरकार, पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती? असा प्रश्न करीत राज्यघटना बदलण्यासाठी तुम्ही सत्तेत गेलात का? असा सरकारवर जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांनी रोह्यातील भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्र मात केला.
सोमवारी रोह्यातील वरसे जिल्हा परिषद गटातील भुवनेश्वर ते अशोक नगर प्रमुख जिल्हा मार्गाच्या अंदाजे २ कोटी रुपयांच्या रस्त्याचे व वरसे ग्रामपंचायत हद्दीतील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून मिळालेल्या पहिल्या टप्प्यातील ३ कोटी १० लाख
रु पयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या प्रसंगी सरकारवर जोरदार हल्ला चढवित ते बोलत होते. याप्रसंगी आ.अनिल तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, जिल्हाध्यक्ष विनोद घोसाळकर, रोहा पं. स. सभापती वीणा चितळकर आदी उपस्थित होते.