'अजितदादांनी पक्षातील लोकशाही समोर आणली तेव्हा....', धनंजय मुंडेंनी पवार गटावर केले आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 05:01 PM2023-11-30T17:01:36+5:302023-11-30T17:06:47+5:30
आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाच्या वैचारिक मंथन शिबीराला सुरुवाात झाली आहे.
रायगड- आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार यांच्या गटाच्या वैचारिक मंथन शिबीराला सुरुवाात झाली आहे, या शिबीरासाठी राज्यभरातून नेते उपस्थित आहेत. दरम्यान, सुरुवातीला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात अजितदादांच्या नेतृत्वात नंबर एकचा पक्ष करुया असं आवाहन केलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी मित्र कोण... शत्रू कोण हे गणित कळले नाही... ही कविता बोलत अजितदादा पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, काही लोकांकडून लोकशाही टिकली पाहिजे असे सांगितले जायचे मग ती पक्षातील असो, राज्यातील मात्र जेव्हा पक्षातील लोकशाही अजितदादा पवार यांनी समोर आणली, त्यावेळी दादांना खलनायक ठरवण्यात आले, असं सांगत धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान
"प्रत्येक भूमिका घेतल्या त्यावेळी खलनायक कोण तर अजितदादा ठरले . स्वतः च्या नेतृत्वासाठी अनेक निर्णय घेतले. त्यावेळी अजितदादा चांगले होते परंतु पक्षातील लोकशाही टिकवण्यासाठी निर्णय घेतला तर ते खलनायक झाले आणि आज कोणपण टिका करत आहेत, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी यावेळी लगावला. 'काहींना दादांची जागा मिळवल्याचा भास होतो आहे, कर्जत - जामखेड उमेदवारी घेण्यासाठी काहीजण भाजपकडून फिल्डिंग लावत होते. त्यांनी आमच्यावर टिका करावी, अशी टीकागही मुंडे यांनी केली.
"दादांचे योगदान कुणी विसरु शकत नाही"
"अजितदादांची महाराष्ट्राला गरज आहे. दादा तुम्ही केलेले काम महाराष्ट्राला सांगितले नाही. मात्र अजितदादा यांनी परळी विधानसभा मला दिली नसती तर परळी विधानसभा राष्ट्रवादीकडे आला नसता म्हणून दादांचे योगदान कुणी विसरु शकत नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले. दादांच्या समोर महाराष्ट्राचा विकास आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. आपल्याकडे कोहिनूर हिरा असताना आपण बॅकफूट जायचे नाही तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतील शिबीरातून फ्रंटफूटवर येऊन काम करायचे आहे, अशा विश्वासही मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला.