ग्रामीण सत्ताकेंद्रावरही महाविकास आघाडी, लोणेरे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 09:51 AM2021-01-19T09:51:03+5:302021-01-19T09:52:15+5:30

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची निवडणूक एकत्रित लढण्यात आली. त्यामध्ये महाविकास आघाडाली इतरांपेक्षा घवघवीत यश मिळाले आहे, तर स्वतंत्रपणे लढलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने १७ ग्रामपंचायींवर निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे.

Mahavikas Aghadi also on rural power centers | ग्रामीण सत्ताकेंद्रावरही महाविकास आघाडी, लोणेरे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे

ग्रामीण सत्ताकेंद्रावरही महाविकास आघाडी, लोणेरे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे

Next

रायगड : जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने सर्वाधिक २२ ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले. राष्ट्रवादी काॅंग्रेसने १७, शिवसेना १३, शेकाप आणि भाजप प्रत्येकी १२, भाजप-शिवसेना आघाडी ६, विकास पॅनेल ३, काॅंग्रेस २ आणि एक अपक्ष असे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. विजयी उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळत जल्लाेष साजरा केला. १५ जानेवारी राेजी ७८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली हाेती. तत्पूर्वी १० ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या हाेत्या. मतमाेजणी सोमवारी सकाळी पार पडली. ग्रामीण भागामध्ये साेयीस्कर राजकारण करण्यात येते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे.

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची निवडणूक एकत्रित लढण्यात आली. त्यामध्ये महाविकास आघाडाली इतरांपेक्षा घवघवीत यश मिळाले आहे, तर स्वतंत्रपणे लढलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने १७ ग्रामपंचायींवर निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. शिवसेने १३, तर शेकाप आणि भाजप यांना प्रत्येकी १२ ग्रामपंचायती खिशात घातल्या आहेत. काॅंग्रेसला फक्त दाेनच ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करता आले आहे. भाजप-शिवसेना आघाडीला ६, स्थानिक विकास पॅनेल ३ आणि एक अपक्ष असे राजकीय समीकरण स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष आरक्षण साेडतीकडे लागले आहे.

अलिबागमध्ये शेकापची सत्ता -
अलिबाग : तालुक्यात ४ ग्रामपंचायतींत झालेल्या निवडणुकीत पेझारी, सासवणे आणि वाघोडे या ३ ग्रामपंचायतींवर शेकापने दणदणीत विजय मिळविला आहे, तर मानतर्फे झिराडमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. त्यामुळे शेकापने आपला गड शाबूत ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील मानतर्फे झिराड ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. येथे शिवसेनेचे ५, शेकापचे ३ आणि काँग्रेसचे ३ उमेदवार निवडून आले, तर दुसरीकडे पेझारीमध्ये ९ पैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवीत शेकापने निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सासवणे ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी निवडणूक होती. यापैकी प्रभाग १ मधून भाग्यश्री सोमनाथ नाखवा या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर उर्वरित ८ जागांवर शेकापने आपले उमेदवार निवडून आणले आहेत. वाघोडे ग्रामपंचायतीच्या ९ जागांपैकी प्रभाग २ मधील आशिष नरेंद्र म्हात्रे हे बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित ८ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यापैकी ७ जागांवर शेकापने बाजी मारली असून, उर्वरित २ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.

शेकापचा बालेकिल्ला असलेल्या पेझारी ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये ९ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या सर्वच्या सर्व जागांवर शेकापने  उमेदवार निवडून आणले. मानतर्फे झिराड ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. त्यामुळे शिवसेनेला टक्कर देण्यासाठी शेकापने चांगलाच जोर लावला होता. अपेक्षेप्रमाणे याठिकाणी अटीतटीची लढत झाली आहे.  ११ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे ५ उमेदवार निवडून आले, तर काँग्रेस आणि शेकापचे प्रत्येकी ३ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे याठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना विरुद्ध शेकाप अशा लढतीमध्ये काँग्रेसने ३ जागा निवडून आणल्याने सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात गेल्या आहेत. 

लोणेरे ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे
माणगाव - लोणेरे ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी १० जागांवर शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकवण्याचा विक्रम केला आहे. लोणेरे ग्रामपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून, शिवसेनेला लोणेरे ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. शिवसेना पुरस्कृत समर्थ विकास पॅनलला अभूतपूर्व यश मिळून अकरापैकी दहा उमेदवार विजयी होऊन शिवसैनिकांनी इतिहास घडविला आहे. निकाल हाती येताच लोणेरे नाक्यावर शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांचा आतषबाजीत व मोठ्या जल्लोषात विजयी उमेदवारांचे स्वागत केले. यावेळी आमदार भरत गोगावले यांनी सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पोशीर ग्रामपंचायतीत परिवर्तन 
नेरळ - कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन विकास आघाडीने बाजी मारली आहे. ग्रामविकास आघाडी आणि परिवर्तन विकास आघाडी अशी लढत झाली. या लढतीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे ६ उमेदवार निवडून आल्याने अखेर पोशीर ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडले असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोशीर ग्रामपंचायतीमध्ये ११ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात होते. यात चार प्रभागांतील ६ उमेदवार परिवर्तन विकास आघाडीचे तर ५ ग्रामविकास आघाडीचे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे पोशीर ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष सोडून इतर सर्वच पक्षांचे दोन गट पाहायला मिळाले आणि शेतकरी कामगार पक्षाच्या एकीमुळेच हे परिवर्तन घडल्याचे बोलले जात .

Web Title: Mahavikas Aghadi also on rural power centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.