मतदारयादीतील नावांवरून जुंपली; शेकाप- काँग्रेस आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:54 PM2018-10-30T22:54:49+5:302018-10-30T22:55:30+5:30

तहसीलदारांना दिले निवेदन; बोगस नावे काढण्यावरून वाद

The names of the electoral rolls; PW-Congress | मतदारयादीतील नावांवरून जुंपली; शेकाप- काँग्रेस आमनेसामने

मतदारयादीतील नावांवरून जुंपली; शेकाप- काँग्रेस आमनेसामने

googlenewsNext

अलिबाग : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे वारे सध्या जिल्ह्यात वाहताना दिसत आहे. अलिबागमध्ये एकमेकांचे पारंपरिक विरोधक शेकाप आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतदार यादीत नावे कमी करणे आणि नवीन नावे घालणे यावरून चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे.

अलिबाग तहसीलदार कार्यालयात सोमवारी याचा प्रत्यय आला. शेकापने सुमारे २८६ मतदार बोगस असल्याचे पत्र प्रशासनाला दिले. शेकापने याबाबत तहसीलदारांना थेट पुरावेच सादर केल्याने वातावरण चांगलेच तणावाचे झाले होते.

अलिबागमध्ये शेकापला अजूनही काँग्रेसकडून प्रखर विरोध केला जात आहे. हे पारंपरिक कट्टर विरोधक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी एकमेकांबरोबर भिडत असतात. सध्या मतदारयाद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम सुरूआहे. त्यानुसार तहसीलदार कार्यालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या लेटरहेडद्वारे अलिबागच्या प्रांताधिकाऱ्यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये तालुक्यातील २८६ मतदार बोगस आहेत, तसेच त्यांनी बोगस पुरावे दिले आहेत.

अलिबाग तालुक्यातील सार्तिजे ग्रामपंचायतीमधील मतदारांच्या नावाचा समावेश आहे. त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करणारे तलाठी, मंडळ अधिकारी आणि संबंधित मतदार यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. यातील बहुतांश मतदार हे काँग्रेसचे आहेत.

काँग्रेस तालुकाध्यक्ष योगेश मगर यांनी यावेळी तहसीलदार यांच्यासमोर आक्र मक भूमिका मांडताना मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण हे वेळोवेळी होत असते, पण एखाद्या पक्षाच्या नेत्याने वारंवार एकच तक्रार करायची आणि प्रशासनाने अशा प्रकारे मतदारांना सातत्याने त्रास देणे हे योग्य नाही. एकदा तपासणीची प्रकिया पूर्ण झाली आणि त्यामध्ये शासनाची खात्री झाली असेल तर मतदारांना सारख्या नोटिसा काढणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघामधील मतदारांची नावे बेकायदेशीररीत्या कमी करण्याबाबत मतदार नोंदणी अधिकाºयांवर दबाव टाकणाºयाविरोधात कारवाई करावी अशी लेखी तक्र ार ठाकूर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली
आहे. या वेळी ठाकूर यांच्या सोबत जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड.श्रद्धा ठाकूर, राजा ठाकूर, रवींद्र (काका) ठाकूर, सातीर्जे सरपंच रवींद्र नाईक, अ‍ॅड.उमेश ठाकूर, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसतर्फे जनआंदोलन करण्याचा इशारा
धरमतर परिसरामध्ये स्वत:च्या कंपनीमधील परप्रांतीयांच्या मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेणारे आमदार जयंत पाटील आणि पंडित पाटील हे स्थानिकांची नावे कमी करण्यासाठी अधिकाºयांवर दबाव आणत आहेत. अधिकाºयांनी दबावाखाली येऊन मतदारांची नावे कमी केल्यास काँग्रेस पक्षातर्फे या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सोमवारी अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन दिला.

Web Title: The names of the electoral rolls; PW-Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.