पनवेलमधील अनाधिकृत गाळ्यांवर महापालिकेचा हातोडा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:18 PM2019-06-01T23:18:35+5:302019-06-01T23:18:53+5:30
२१ पैकी चार गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली असल्याने चार गाळ्यांवर कारवाई कारण्यात आली नसल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.
पनवेल : महापालिका मुख्यालयासमोरील देवाळे तलाव परिसरातील अनधिकृत गाळे शनिवारी जमीनदोस्त करण्यात आले. या ठिकाणी २१ गाळे अनधिकृत आहेत. तलावाच्या सुशोभीकरणाला गाळ्यांचा अडथळा होत असल्याने अनेक वेळा संबंधित गाळेधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. अखेर मोठ्या पोलीस बंदोबस्तात शनिवारी ही कारवाई करण्यात आली. २१ पैकी चार गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली असल्याने चार गाळ्यांवर कारवाई कारण्यात आली नसल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. उर्वरित गाळ्यांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे कारवाईला कोणीही विरोध केला नाही. दोन जेसीबीच्या साहाय्याने गळ्यातील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. या वेळी प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे, शहर अभियंता संजय कटेकर उपस्थित होते. शहरातील अनधिकृत झोपड्यांवर कारवाईसाठी पालिकेने कंबर कसली असून व्यावसायिक गाळे पालिकेने दोन दिवसांपूर्वी जमीनदोस्त केले.