प्रकाश सोळंकी यांना दिलेला शब्द जयंत पाटलांनी फिरवला; अजितदादांनी पाटलांना कोंडीत पकडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 04:36 PM2023-12-01T16:36:37+5:302023-12-01T16:37:35+5:30

रायगड येथील कर्जत येथे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे वैचारिक मंथन शिबीर झाले.

ncp leader ajit pawar criticized on mla jayant patil | प्रकाश सोळंकी यांना दिलेला शब्द जयंत पाटलांनी फिरवला; अजितदादांनी पाटलांना कोंडीत पकडलं

प्रकाश सोळंकी यांना दिलेला शब्द जयंत पाटलांनी फिरवला; अजितदादांनी पाटलांना कोंडीत पकडलं

रायगड- रायगड येथील कर्जत येथे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे वैचारिक मंथन शिबीर झाले.  हे शिबीर काल गुरुवारपासून सुरू होतं. या शिबीरासाठी राज्यभरातून अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना अनेक नेत्यांनी शरद पवार गटावर आरोप केले. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार आरोप केले. आमदार प्रकाश सोळंके यांना त्यावेळी दिलेला शब्द जयंत पाटील यांनी फिरवला असा आरोप अजिदादांनी आज केला. 

जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल; "तुम्ही पवार नसता तर..."

यावेळी सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांवर आरोप केले. "आधीच्या सरकारच्या मंत्रिमंडळात प्रकाश सोळंके यांना मंत्री व्हायचे होते, त्यावेळी त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यावेळी सोळंके नाराज झाले. प्रकाश सोळंके त्यावेळी राजिनामा देण्याच्या तयारीत होते. तेव्हा आम्ही त्यांना समजावून सांगितलं. यावेळी सोळंके म्हणाले, मागच्यावेळीही मला मध्येच काढून टाकलं, पक्षाने माझ्याबाबतीत ही भूमिका का घेतली हे मला समजलं पाहिजे, शेवटी सोळंके यांना आम्ही एका चेंबरमध्ये घेऊन गेलो आणि सगळं समजावून सांगितलं. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले होते की, एक वर्ष मी पक्षाचा अध्यक्ष राहतो. एक वर्षानंतर तुम्ही कार्याध्यक्षाचा अध्यक्ष व्हा आणि संघटनेची सबाबदारी तुम्ही पार पाडा, असा शब्द जयंत पाटील  यांनी सोळंके यांना शब्द दिला होता. 

" यावेळी प्रकाश सोळंके यांनी राजीनामा देण्याचे रद्द केले. मला जबाबदारी द्या, मला काम करायचे आहे, असंही तेव्हा सोळंके म्हणाले होते. नंतर या गोष्टीला एक वर्ष झाल्यानंतर मी जयंत पाटलांना सांगितले आपण सोळंके यांना शब्द दिला आहे. यावर जयंत पाटील म्हणाले, वरिष्ठ म्हणत आहेत तुच रहा रहा, परत सोळंके यांना पद दिलेच नाही. शब्द दिला तर त्यांना ती पद द्यायला पाहिजेत. पद देत असताना कार्यकर्त्यांना नाराज करायचं सुरू होते. याच गोष्टी कार्यकर्त्यांच्या मनात साठत जातात, असंही अजित पवार म्हणाले.  

Web Title: ncp leader ajit pawar criticized on mla jayant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.