कोरेगाव भीमाबाबत पंतप्रधान काहीच बोलले नाहीत - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:42 AM2018-01-09T01:42:51+5:302018-01-09T01:43:12+5:30

भारतात कोरेगाव भीमा येथे एवढी मोठी घटना घडली. भारत देशाने नोंद घेतली. संपूर्ण मीडियाने दखल घेतली, पण पंतप्रधानांनी कोरेगाव भीमाबाबत एकही स्टेटमेंट दिले नाही, असे उद्गार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काढले.

PM does not speak anything about Koregaon Bhima - Ajit Pawar | कोरेगाव भीमाबाबत पंतप्रधान काहीच बोलले नाहीत - अजित पवार

कोरेगाव भीमाबाबत पंतप्रधान काहीच बोलले नाहीत - अजित पवार

Next

माणगाव : भारतात कोरेगाव भीमा येथे एवढी मोठी घटना घडली. भारत देशाने नोंद घेतली. संपूर्ण मीडियाने दखल घेतली, पण पंतप्रधानांनी कोरेगाव भीमाबाबत एकही स्टेटमेंट दिले नाही, असे उद्गार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काढले.
माणगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी झाले. या वेळी आयोजित जाहीर सभेत ते बोेलत होते. सर्व जनतेला कोरेगाव-भीमा येथे नक्की काय झाले याबाबत माहिती जाणून घ्यावयाची असताना पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. फक्त चाय पे बात बोलत आहेत. आदिवासी बांधव, मागासवर्गीय जनतेचे हाल झाले आहेत. भाजपा-शिवसेना युती ही फेकू व खोटारडे सरकार आहे. या सरकारच्या काळात जनतेचा प्रचंड भ्रमनिरास झाला. नोटाबंदी झाल्यामुळे विकासदर घटला आहे, अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली. दिलेला शब्द पाळायचा असतो हे आम्हाला राजकीय जीवनात शरद पवारांनी शिकवले. शिवसेना-भाजपा सरकारने कोकणावर अन्याय केला आहे. शेतक ºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. विजेच्या संदर्भातील प्रश्न बिकट झाले आहेत. उद्धव ठाकरे भाजपावर टीका करतात, पण सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत करत नाहीत. मेक इन इंडियाच्या नावाखाली अनेक प्रकल्प पंतप्रधानांनी गुजरातला पळविले आहेत. या काळात समाजाचा कोणताही घटक समाधानी नाही. शेतकरी समाधानी नाहीत. त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. ऊस उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी १०० दिवसांत महागाई कमी होणार असे सांगितले होते. सत्ता येऊन १००० दिवस झाले अजून महागाई कमी झालेली नाही. गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याने महिला वर्ग नाराज आहे. आमच्या काळातील कित्येक योजना आहेत त्या योजनांची फक्त नावे या सरकारने बदलली आहेत. शेतकºयांचे पेकाट या सरकारने मोडले आहे. या मुख्यमंत्र्यांना शाश्वत शेती काय समजणार? कोरेगाव भीमा घटना का घडली, सरकारचा कुठेच धाक राहिला नाही. समाजाला उच्च न्यायालयाने सांगितले असतानाही अजून शिक्षणात आरक्षण दिलेले नाही, असे सांगत येणाºया काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ताकद उभी करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
माणगाव नगर पंचायत हद्दीतील नाना-नानी पार्क, दत्तनगर रस्ता, उतेखोलवाडी रस्ता, कचेरी रोड रस्ता, नाट्यगृह अशा सहा कोटी रु पयांच्या विकासकामांचा शुभारंभ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्या हस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, युवा नेते अनिकेत तटकरे, आ. अनिल तटकरे, माणगाव नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, गोरेगाव सरपंच झुबेर अब्बासी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रभाकर उभारे आदींसह माणगाव नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माणगावमध्ये वातानुकूलित नाट्यगृह होणार
माणगाव नगर पंचायत निवडणुकीदरम्यान आ. तटकरे यांनी माणगावकरांना अभिवचने दिली होती त्याची पूर्तता होताना आनंद वाटतो आहे. केंद्रात व राज्यात भाजपा व शिवसेना सत्तेवर आहे. या सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळलेली दिसत नाहीत. गुजरातने त्यांना नाकारले. समविचारी पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवल्या असत्या तर गुजरातचे चित्र आज वेगळे असते. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच जनतेचा विचार केला आहे. शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ता, वीज, पाणी हे नाही.
शहराचा सांस्कृतिक, साहित्यिक दर्जा उंचावला पाहिजे, त्यातून चांगले कवी, संपादक, लेखक यांचे विचार सर्वांना ऐकायला मिळावेत हा उद्देश नजरेसमोर ठेवून आ. तटकरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे माणगावात साडेतीन कोटींचे नाट्यगृह होईल. ते प्रशस्त, वातानुकूलित असेल. त्यामध्ये चांगला हॉल, त्यामध्ये ५०० आसन खुर्च्या, पार्किंगची व्यवस्था असे हे नाट्यगृह होणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

Web Title: PM does not speak anything about Koregaon Bhima - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.