...तर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 08:11 AM2021-06-05T08:11:01+5:302021-06-05T08:14:58+5:30

वादळग्रस्तांना दिली तीनपट अधिक रक्कम 

then we will black list the contractor says deputy cm ajit pawar | ...तर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

...तर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

googlenewsNext

रायगड : पाच वर्षांत चार वादळं आली. पण राज्य सरकार तुमच्या सोबत आहे. केंद्र सरकारचे नियम लहान असतील तरी साडेतीन पट पैसे देण्याचं काम राज्याने केले. कोरोना कसा हल्ला करेल, सांगता येत नाही. नियम ठरवून दिल्याप्रमाणे पालन करण्याचचे आपले काम आहे. विकासाची सुरुवात झाली, पण कामाला सुरुवात करताच कोरोनाने प्रवेश केला. त्यामुळे १४ महिने झाले राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा कमी झाला. विकासकामे चांगली झाली पाहिजेत.नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही, हे आधीच सांगून ठेवतोय. असा इशारा मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. श्रीवर्धनमधील बीच सुशोभीकरण व २३ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

पवार पुढे म्हणाले कि, सध्या प्री-वेडिंगचा ट्रेंड आहे. लग्नाआधीच्या आठवणींसाठी विवाह बंधनात अडकणारे जाेडपे असे चित्रीकरण करतात. प्री-वेडिंगचा व्यवसाय आहे. त्यामुळे गडकिल्ले यावर प्री-वेडिंगचे शूटिंग करताना त्यांना अडवू नका. प्री-वेडिंगच्या माध्यमातून पर्यटन विकास कसा साधता येईल, याचा विचार करा. त्याबाबत आवश्यक ती नियमावली जिल्हाधिकारी आणि पाेलीस अधीक्षकांनी एकत्रित तयार करावी, तसेच त्यासाठी काही शुल्कही आकारावे, असा सल्ला पवार यांनी दिला. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातील तब्बल २३ काेटी रुपयांच्या पाणीपुरवठा याेजनेच्या कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते. पवार यांच्या या सल्ल्यामुळे नजीकच्या कालावधीत समुद्रकिनारी, पर्यटन स्थळी प्री-वेडिंग करणाऱ्या जोडप्यांना आणि शूटिंग करणाऱ्यांना आता कोणतीही अडचण येणार नसल्याचे दिसून येते. अनेक वेळा प्री-वेडिंग शूटिंगसाठी नियमावली नसल्याने भांडणाचे प्रसंग निर्माण होत असतात. त्यामुळे पोलिसांपर्यंत हा विषय जातो मात्र, त्यांना परवानगी दिल्यास हे वाद टाळले जातील, असेही पवार यावेळी स्पष्ट केले.
 

Web Title: then we will black list the contractor says deputy cm ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.