Rajasthan Politics: राहुल गांधीच्या भावनिक आवाहानानंतर राजस्थान काँग्रेसमधील वाद मिटला? गेहलोत - पायलट यांच्यात समेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 09:50 AM2023-05-30T09:50:12+5:302023-05-30T09:53:32+5:30

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.

rajasthan politics rahul gandhi emotional appeal patched up ashok gehlot and sachin pilot | Rajasthan Politics: राहुल गांधीच्या भावनिक आवाहानानंतर राजस्थान काँग्रेसमधील वाद मिटला? गेहलोत - पायलट यांच्यात समेट

Rajasthan Politics: राहुल गांधीच्या भावनिक आवाहानानंतर राजस्थान काँग्रेसमधील वाद मिटला? गेहलोत - पायलट यांच्यात समेट

googlenewsNext

गेल्या काही दिवसापासून राजस्थान काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान आता या दोन नेत्यांच्या मध्ये समेट घडल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सचिन पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील वाद मिटवण्यासाठी एक बैठक झाली. दरम्यान, हायकमांडने दोघांनाही भावनिक आवाहन केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद तीन फॉर्म्युल्यांद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला. पण अजुनही यांच्यातील वाद मिटला नसल्याचे बोलले जात आहे. 

Balu Dhanorkar: चंद्रपूर: काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन; दोन दिवसांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपलेले

काल रात्री झालेल्या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित होते. गांधी यांनी अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोन्ही नेत्यांना सांगितले की, तुमच्या दोघांचे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि अपेक्षा आम्ही सांभाळू. तुम्ही समान नेतृत्वाखाली एकत्र निवडणूक लढवा, राजस्थान जिंका. हिमाचल, कर्नाटकानंतर हे राज्य आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आपण मजबूत आहोत. येथे तुम्ही एकत्रित नेतृत्वाखाली पक्षाला विजयी करा, असं आवाहन केलं.

राहुल गांधींच्या या भावनिक आवाहनावर अजून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे बोलले जात आहे. पण, दोघांनी एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले आणि सर्व काही राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोडले. त्यामुळेच बैठकीनंतर संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी राजस्थानमध्ये संयुक्त नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरण्याची आणि दोन्ही नेत्यांच्या हायकमांडचा निर्णय मान्य करण्याची घोषणा केली, मात्र दोन्ही नेते गप्प बसले.

आता हे मौन काँग्रेस हायकमांडला तात्पुरता दिलासा देणारा असला तरी दोघांमधील राजकीय सत्तेचे विभाजन अद्याप बाकी आहे. म्हणूनच हा समेट सध्या तात्पुरता आहे, जोपर्यंत हायकमांडचा फॉर्म्युला निघत नाही आणि दोघेही ते मान्य करत नाहीत, तोपर्यंत हा राजकीय फोटो तुमच्यापेक्षा काही नाही.

नेते शांत करण्यासाठी पदांची परंपरा नाही : गेहलोत

पक्ष नेतृत्व मजबूत असून, ते कधीही एखादा नेता किंवा कार्यकर्त्याचे मन वळविण्यासाठी त्याला एखादे पद देऊ करणार नाही, तशी परंपरा पक्षात नाही, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी येथे म्हटले. राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष तीव्र झाला असताना गेहलोत यांनी हे विधान केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्यापूर्वी त्यांनी हे वक्तव्य केले. 

गेहलोत म्हणाले की, एखादा नेत्याला (पद) त्याच्या म्हणण्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींनी पद देऊ केल्याचे मी कधीही ऐकले नाही. ही परंपरा  काँग्रेसमध्ये नाही. पक्ष नेतृत्व व काँग्रेस प्रचंड मजबूत असून, कोणाच्या मनधरणीसाठी पदाचा प्रस्ताव ठेवला जाईल किंवा एखादा  नेता किंवा कार्यकर्त्याने असे म्हणावे की, मी हे पद नाही, ते पद घेईन, अशी स्थिती आलेली नाही.

Web Title: rajasthan politics rahul gandhi emotional appeal patched up ashok gehlot and sachin pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.