सोलापुरातील राहुल गांधींचा दौरा अनिश्चित; भाजप कार्यकर्ते मात्र प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:51 PM2019-02-07T12:51:47+5:302019-02-07T12:55:13+5:30
सोलापूर : कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा १३ फेब्रुवारीचा सोलापूर दौरा अनिश्चित असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांना समजली. मात्र ...
सोलापूर : कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा १३ फेब्रुवारीचा सोलापूर दौरा अनिश्चित असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांना समजली. मात्र भाजपचे कार्यकर्ते म्हणाले, त्यांच्या दौºयाची आम्ही वाट पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखविलेले काळे झेंडे आम्ही विसरलेलो नाही. राहुल गांधी यांचे वेगळे स्वागत आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्या १३ फेब्रुवारी रोजी सोलापुरात जाहीर सभा घेण्याचे नियोजन प्रदेश काँग्रेस कमिटीकडून करण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकाºयांनी सभेसाठी जागेचा शोध सुरू केला होता. मात्र ही सभा फेब्रुवारी महिना अखेरीस घेण्याचे नियोजन आखले जात आहे.
ही चर्चा सुरू असतानाच बुधवारी सकाळी महापालिकेत सभागृहनेते संजय कोळी यांची भाजप कार्यकर्त्यांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ जानेवारी रोजी सोलापुरात विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी आल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले गेले. देशाचे पंतप्रधान एका चांगल्या कार्यक्रमासाठी आल्यावर असे कृत्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले, याची चर्चा झाली.
त्यामुळे आता काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्याचे स्वागत करण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत, असा इशारा या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी नगरसेवक विनायक विटकर, रवी कैय्यावाले, राजकुमार काकडे आदी उपस्थित होते.
पार्कवर सभा घेऊन दाखवा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर कार्यक्रम झाला. याचपद्धतीने काँग्रेसने राहुल गांधी यांची पार्क स्टेडियमवर सभा घेऊन गर्दी करून दाखवावी असे आव्हान सभागृहनेते संजय कोळी यांनी दिले. काँग्रेसच्या पदाधिकाºयांना राहुल गांधी यांच्या सभेला गर्दी कमी होण्याची भीती वाटल्याने छोट्या मैदानांचा शोध सुरू केला आहे असा टोला त्यांनी लगावला.