“शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला इलेक्टोरल बाँडचा पैसा”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 01:46 PM2024-03-16T13:46:54+5:302024-03-16T13:49:57+5:30

Congress Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra News: इलेक्टोरल बाँड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खंडणी वसुली रॅकेट आहे. यातून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून पैसे उकळले जातात, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी भाजपावर केला आहे.

congress rahul gandhi criticised bjp over electoral bond issue in bharat jodo nyay yatra at thane | “शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला इलेक्टोरल बाँडचा पैसा”: राहुल गांधी

“शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला इलेक्टोरल बाँडचा पैसा”: राहुल गांधी

Congress Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra News: नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करतात आणि तेच मोदी इलेक्टोरल बाँडच्या माध्यामातून जगातील सर्वांत मोठे खंडणी वसुली रॅकटे चालवतात. कोरोना काळात लाखो लोकांचा मृत्यू होत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्यास सांगत होते. तर दुसरीकडे कोरोना लस बनवाणारी सिरम कंपनी कोट्यवधी रुपये इलोक्टोरल बाँडमधून नरेंद्र मोदींना देत होती, असा गंभीर आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.
 
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ठाण्यात सभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी भाजपावर हल्लाबोल केला. इलेक्टोरल बाँड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खंडणी वसुली रॅकेट आहे. या रॅकेटमधून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून पैसे उकळले जातात. याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास अमित शाह ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून त्यांचा आवाज दडपून टाकतात. शिवसेना पक्ष फोडून जे आमदार बाहेर पडले ते काय असेच मोफत गेले का ? महाराष्ट्र, गोवा राज्यातील सरकार पाडण्यात याच इलेक्टोरल बाँडमधून कमावलेल्या खंडणीच्या पैशाचा वापर केला गेला, या शब्दांत राहुल गांधींनी निशाणा साधला.

राम मंदिराच्या उद्घाटनाला मोजक्या लोकांना बोलावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले पण या सोहळ्याला आदिवासी, दलित, मागास, गरिब समाजातील कोणालाही बोलावले नाही. नरेंद्र मोदी, मोहन भागवत, फिल्मस्टार्स, क्रिकेटपटू, अंबानी, अदानी असे मोजक्या लोकांनाच निमंत्रित केले होते. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी असल्याने त्यांनाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही, झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी असल्याने त्यांनाही राम मंदिर सोहळ्याला बोलावले नाही. देशात ओबीसी, दलित, मागास, आदिवासी समाजाची ८८ टक्के लोकसंख्या आहे पण प्रशासनासह महत्वाच्या क्षेत्रात त्यांची भागिदारी अत्यंत कमी आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
 

Web Title: congress rahul gandhi criticised bjp over electoral bond issue in bharat jodo nyay yatra at thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.