RSS विरोधात बदनामीकारक वक्तव्य, राहुल गांधींविरोधात १६ ऑकटोबरला भिवंडी न्यायालयात पुढील सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 05:57 PM2021-09-21T17:57:05+5:302021-09-21T18:00:54+5:30
Rahul Gandhi News: या दाव्या विषयी पुढील सुनावणी १६ ऑकटोबरला होणार आहे. अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील ऍड नारायण अय्यर यांनी दिली आहे
भिवंडी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले होते की, आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे स्थानिक कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सोमवारी भिवंंडी न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान फिर्यादी व राहुल गांधींच्या वकिलांनी न्यायलायत युक्तीवाद करून या दाव्या विषयी पुढील सुनावणी १६ ऑकटोबरला होणार आहे. अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील ऍड नारायण अय्यर यांनी दिली आहे