भिवंडीत राहुल गांधी यांच्या स्वागताला काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी ; नागरिकांमध्ये उत्साह
By नितीन पंडित | Published: March 15, 2024 05:20 PM2024-03-15T17:20:26+5:302024-03-15T17:21:59+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवारी भिवंडीत दाखल झाली.
नितीन पंडित, भिवंडी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवारी भिवंडीत दाखल झाली. भिवंडी वाडा मार्गाने ही यात्रा सायंकाळी वंजारपट्टी नाका येथून शहरात दाखल झाली. शहरातील मनपा मुख्यालयाच्या समोर असलेल्या धर्मवीर आनंद दिघे चौक येथे राहुल गांधी यांची चौकसभा होणार असल्याने दुपारपासूनच या ठिकाणी नागरिकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. काँग्रेसचे झेंडे, राहुल गांधी यांच्या न्याय भारत जोडो न्याय यात्रेचे फलक व बॅनर हातात घेऊन काँग्रेस कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने सभास्थळी दाखल झाले होते.
राहुल गांधी यांना पाहण्यासाठी सभास्थळी दुपारपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच धर्मवीर चौकात प्रचंड गर्दी केली होती. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असतानाही काँग्रेसचे शेकडो मुस्लिम कार्यकर्ते रोजा उप वास राहुल गांधी यांच्या स्वागताला दुपारपासून हजर झाले होते. यावेळी सभा ठिकाणाहून भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती तर काँग्रेस व राहुल गांधी यांचा जयघोष कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता. या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड आनंद व उत्साहाचे वातावरण पाहिला मिळाले.
राहुल गांधी येणार असल्याने सभास्थळी शहरातील रस्त्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फुलांचा सडा पसरवला होता. त्यामुळे एरवी कचरा असलेल्या भिवंडीतील रस्त्यांवर आज फुलांचा सडा पाहायला मिळाला.