Thane: कॉंग्रेसकडून ठाण्यात खासदार अनुराग ठाकूरांच्या निषेधार्थ आंदोलन
By सुरेश लोखंडे | Published: August 2, 2024 05:41 PM2024-08-02T17:41:23+5:302024-08-02T17:42:16+5:30
Thane News: भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी ‘ज्यांच्या जातीचा पत्ता नाही, ते जात निहाय जनगणेची मागणी करत आहेत, असे वक्तव्य करून देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा त्यांनी अपमान केला, असा आराेप करून त्यांच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीव्र आंदाेलन करून ठाणेकरांचे लक्ष वेधले.
-सुरेश लोखंडे
ठाणे - विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जात निहाय जनगणनेचा मुद्दा मांडला. त्यास विराेध करीत भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी ‘ज्यांच्या जातीचा पत्ता नाही, ते जात निहाय जनगणेची मागणी करत आहेत, असे वक्तव्य करून देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा त्यांनी अपमान केला, असा आराेप करून त्यांच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीव्र आंदाेलन करून ठाणेकरांचे लक्ष वेधले.
येथील शासकीय विश्रामगृहासमाेर शेकडाे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत पक्षाचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपासह अनुराग ठाकूर यांच्या विराेधात आंदाेलन छेडले. यावेळी कार्यकर्त्यांनी अनुराग ठाकून यांचे वक्तव्य हे जातीयवादी असल्याचा आराेप करून त्यांच्या निषेधार्थ आंदाेलन छेडण्यात आले. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी जे बी यादव, सुखदेव घोलप, भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, रमेश इंदीसे, शितल अहेर,महिला अध्यक्ष स्मिता वैती, ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, मागासवर्गीय अध्यक्ष उमेश कांबळे, किसान सेल अध्यक्ष ऋषिकेश तायडे, पर्यावरण अध्यक्ष मनोज डाकवे,सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्निल कोळी, ब्लॉक अध्यक्ष अंजनी सिंग,हिंदुराव गळवे,राजू शेट्टी,जावेद शेख,सुरेश भोईर ,आनंद सांगळे,जेष्ठ नेते महिंद्र म्हात्रे, सुरेश पाटील खेडे, शिरीष घरत,दयानंद एगडे, गोपाळ सावंत,प्रसाद पाटील,बाबू यादव,सुभाष ठोंबरे, मुन्ना राजोरिया, अमरनाथ गुप्ता,संजय घाग,संगीता कोटल, शेणू नायर प्रतिभा मेनन, अपर्णा सावंत, किशोर कांबळे, किरायात मुकादम, राज चव्हाण, सुमन वाघ, आशा म्हस्के ,रवी डोळस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.