राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी व त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 1998 साली करण्यात आली. हे महामंडळ कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे. महामंडळात बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.