आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख आहे. 29 एप्रिल 1968मध्ये मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.