महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.