१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते.