पराग अग्रवाल Parag Agrawal ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. २०११ पासून ते ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. २०१७ मध्ये त्यांच्याकडे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. अग्रवाल यांचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आहे. २००५ मध्ये आयआयटी मुंबईतून त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पूर्ण केली.