"मोदी सुना रहे हैं नानी को ननिहाल का हाल..."; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर वाराणसी स्टाइलमध्ये पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 09:28 PM2024-02-23T21:28:22+5:302024-02-23T21:29:13+5:30
राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील पेपर लीक प्रकरणाचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील पेपर लीक प्रकरणाचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करत कॅप्शनमध्ये लिहिले, "लखनौ ते प्रयागराजपर्यंत पोलीस भरती पेपरफुटीच्या मुद्द्यावर तरुण रस्त्यावर उतरले आहेत आणि तेथून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाराणसीतून पंतप्रधान तरुणांच्या नावावर तरुणांचीच दिशाभूल करत आहेत. याच ट्विटमध्ये पुढे राहुल गांधी यांनी म्हटले आहे, "थेट वाराणसीच्याच अंदाजात सांगायचे तर, 'मोदी जी नानी को ननिहाल का हाल सुना रहे हैं.'"
पंतप्रधा मोदींनी राहुल गांधींवर साधला होता निशाणा -
"जे स्वतः शुद्धीत नाहीत, ज्यांची संवेदना संपुष्टात आली आहे, ते काशी, यूपीच्या मुलांना अंमली पदार्थांचे व्यसनी म्हणत आहेत. येथील तरुणाई विकसित यूपी बनवण्यात व्यस्त आहे, हे लक्षात ठेवा. इंडिया आघाडीने यूपीतील तरुणांचा केलेला अपमान कधीही विसरता येणार नाही," असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ते प्रत्येक निवडणुकीच्या वेळी एकत्र येतात आणि निकाल शून्य आला की, एकमेकांना शिव्या देऊन वेगळे होतात, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला.
काय म्हणाले होते राहुल गांधी -
राहुल गांधी म्हणाले होते, 'मी वाराणसीला गेलो होतो, तेव्हा बघितले, रात्रीच्या वेळी बाजा वाजत आहे आणि दारू पिऊन यूपीचे भविष्य रस्त्यावर पडलेले आहे. तेथे यूपीचे भविष्य दिरू पिऊन नाचत आहे. दुसरीकडे आपल्याला राम मंदिरात नरेंद्र मोदी दिसतील, अंबानी दिसतील, अदानी दिसतील. भारतातील अब्जाधीश दिसतील. मात्र कुणी मागास, दलित, आदिवासी दिसणार नाही. ती तुमची जागा नाही. तुमची जागा रस्त्यावर भीक मागण्याची आणि पोस्टर दाखविण्याची आहे. त्यांचे काम पैसे मोजायचे आहे.'