राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसजन रस्त्यावर; केंद्र सरकारचा केला निषेध
By अभिनय खोपडे | Published: March 25, 2023 05:25 PM2023-03-25T17:25:08+5:302023-03-25T17:26:35+5:30
आर्वी, कारंजा, सिंदी (रेल्वे) केंद्र सरकारचा निषेध
वर्धा : सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसनेतेराहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले. त्या निषेधार्थ जिल्ह्यातील काँग्रेसजन रस्त्यावर उतरले आहेत. आर्वी येथे माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी देशातील लोकशाही धोक्यात आली आहे व अनेक संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्ष संपविण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी माजी आमदार अमर काळे, राजू रत्नपारखी, दिलीप जाधव, विशाल साबळे आदी उपस्थित होते.
कारंजा घाडगे येथेही काँग्रेसकडून केंद्राचा निषेध
कारंजा येथील गोळीबार चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नितीन दर्यापूरकर, भगवान बुवाडे, भिकाराम चौधरी, गोपाळ घाडगे, प्रा.अंधारे, टिपू मोटवाणी, दिलीप राठी, राजेंद्र लाडके, हेमंत बन्नगरे, विशाल इंगळे, संजय मसकी, कमलेश कठाणे, गजू चाफले, सतीश इंगळे, योगेश चौधरी, भिकाराम मस्की, विशाल नासरे, विक्की भादे, एजाज शेख, अतुल मिसाळ, गजू भिलकर, रवी दुधाकर्वे आदी उपस्थित होते.
सिंदी (रेल्वे) शहर काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध
सिंदी शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाशचंद्र डफ यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने देशात हुकूमशाही निर्माण केली असून, सर्वसामान्यांचा पैसा ठरावीक उद्योगपतींच्या घशात घातला जात आहे, असा आरोप प्रकाशचंद्र डफ यांनी केला. यावेळी गजानन खंडाळे, ए. सी. कलोडे, किशोर सोनटक्के, फिरोज बेरा, अजय कलोडे, गुड्डू कुरेशी, मिलिंद बेले आदी उपस्थित होते.