हा महिना आपणास भरपूर आनंद देणारा आहे. सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. जमीन - जुमला किंवा कोर्ट कचेरीशी संबंधित बाबीत सुद्धा आपणास यश प्राप्त होईल. प्राप्तीत तेजी आल्याने आपला आत्मविश्वास उंचावेल व चेहेरा आनंदाने खुलून उठेल. काही लोक व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहिल्याने त्यांच्या व्यापारात तेजी येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती मन लावून आपली कामे करतील. आपली पदोन्नती सुद्धा संभवते. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे काहीसे त्रस्त होऊ शकतात. प्रेमीजन आपले नाते व्यवस्थित सांभाळू शकतील. प्रेमिकेस आपल्या मनातील सर्व विचार सांगितल्यामुळे नात्यातील समस्या दूर होऊन आपसातील सामंजस्य वाढेल. आपण दोघे एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. ह्या महिन्यात आपली प्रकृती सामान्यच राहील.