ह्या महिन्याची सुरवात आपल्यासाठी अनुकूल आहे. आपला आत्मविश्वास उंचावलेला असल्याने प्रत्येक कार्यात यशस्वी होण्यास आपली सुरवात होईल. आपण जे काही काम कराल ते मन लावून कराल व त्यामुळे यश सुद्धा वाढतच जाईल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामगिरी व्यतिरिक्त कठीणात कठीण अशा आव्हानांना मागे सारून पुढे जाण्याची संधी मिळेल. व त्यामुळे आपली पदोन्नती सुद्धा संभवते. वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणास एखादे बक्षीस देऊ शकतात. व्यावसायिकांना नवीन उर्जेसह आपल्या कामात वाटचाल करावी लागेल. त्यामुळे आपल्या व्यवसायास एक आधार मिळेल. विवाहित व्यक्ती आपले वैवाहिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न करतील. प्रेमीजन त्यांच्या प्रणयी जीवनातील गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नात वेळ घालवतील. अर्थात हि वेळ त्यांच्यासाठी काहीशी प्रतिकूलच असेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनात एखाद्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.