Lokmat Astrology

दिनांक : 01-Nov-24

राशी भविष्य

 कन्या

कन्या

हा महिना आपणास चांगले परिणाम देणारा आहे. नोकरीच्या ठिकाणी आपली धावपळ कमी होईल. आपणास वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्यास सुरवात होईल. आपणास आवडीचे पद मिळू शकते, मात्र त्यासाठी आपणास भरपूर प्रयत्न सुद्धा करावे लागतील. सरकारी क्षेत्राकडून काही त्रास होण्याची शक्यता असल्याने आपले काम चोख करावे. व्यापाऱ्यांनी सरकारी योजने विरोधात कोणतेही कार्य करू नये, अन्यथा त्यांना नोटीस बजावली जाऊ शकते. प्राप्तिकरचा भरणा वेळेवर भरणे आपल्या हिताचे होईल. विवाहित व्यक्ती जोडीदाराशी संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतील. परंतु त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकते. प्रणयी जीवनासाठी हा महिना अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून देऊ शकता. सुरवातीस एखादी समस्या निर्माण होईल, परंतु नंतर सर्वजण तिचा स्वीकार करू शकतील. आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा आपल्या कामात व नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात. प्रकृतीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची संधी असल्याने ते अत्यंत खुश होतील. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

31-10-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण चतुर्दशी

नक्षत्र : चित्रा

अमृत काळ : 09:28 to 10:53

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:36 to 11:24 & 15:24 to 16:12

राहूकाळ : 13:45 to 15:11