मागील महिन्यापेक्षा हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. गुरु, बुध व शुक्रामुळे आपल्या व्यवसायाची प्रगती होईल. आपला व्यवसाय नवीन उंची गाठेल. आपले धाडस वाढल्याने एखादा धाडसी व्यावसायिक सौदा आपण कराल. मात्र, आपण तसे विचारपूर्वकच करावे. मागील महिन्याच्या प्रमाणात ह्या महिन्यात खर्च कमी होणार असला तरी सुद्धा तो जास्तच असल्याने प्राप्ती वाढविण्यावर आपणास लक्ष द्यावे लागेल. आपल्या कामावर आपले लक्ष केंद्रित होईल. त्यामुळे आपण नोकरीत सुरक्षित राहाल. आपली प्रयत्नशील प्रवृत्ती वरिष्ठांना प्रभावित करेल. आपल्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य आपणास मिळेल. आपल्या उच्च कार्यक्षमतेचे वरिष्ठांनी केलेल्या प्रशंसेने आपण खुश व्हाल. घरात सुख - शांती नांदेल. असे असले तरी एखाद्या महत्वाच्या गोष्टीमुळे काही काळासाठी कुटुंबात वाद होऊ शकतो. महिन्याच्या सुरवातीस प्रकृतीत घसरण होईल, मात्र उत्तरार्धात त्यात सुधारणा सुद्धा होईल. प्रणयी जीवनासाठी महिना अनुकूल आहे. आपला प्रेम विवाह सुद्धा होऊ शकतो. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतील. आपल्या आनंदात कुटुंबियांना ते सहभागी करून घेतील.