'काँग्रेसने SC, ST, OBC च्या नेत्यांना पुढे येऊ दिले नाही', पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 04:00 PM2023-11-07T16:00:51+5:302023-11-07T16:01:33+5:30
'काँग्रेसने नेहमी खोटी आश्वासने दिली, आम्ही जी आश्वासने दिली ती पूर्ण केली.'
PM Modi Speech: मागील काही दिवसांपासून देशात जातीय जनगणनेची मागणी सुरू झाली आहे. या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील यावरुन काँग्रेसवर सुनावलं. 'काँग्रेसने अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) काहीच काम केले नाही, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
मध्य प्रदेशातील सिद्दी येथील सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, "काँग्रेसने दिल्ली दरबारात हजेरी लावणाऱ्यांनाच पुढे नेले. एससी, एसटी आणि ओबीसींचे प्रभावी नेतृत्व कधीच निर्माण होऊ दिले नाही. या दरबारी मानसिकतेमुळेच हे लोक सकाळ-संध्याकाळ मोदींना शिव्या देतात. मोदींना शिव्या देता-देत त्यांनी ओबीसी समाजाला शिव्या देण्यास सुरुवात केली आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
#WATCH | In Sidhi, Madhya Pradesh, Prime Minister Narendra Modi says "Congress promoted only those who attended the Delhi Darbar. Congress never allowed the talented leadership of SC, ST and OBC communities to emerge. It is their mentality, because of which, they keep abusing… pic.twitter.com/PAxYmNbLcs
— ANI (@ANI) November 7, 2023
'प्रत्येक गोष्टीत खोटं बोलण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. काँग्रेसने नेहमीच गरीब, महिला, तरुणांशी खोटं बोलले आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची खोटी आश्वासने दिली. भाजप सरकार जी काही आश्वासने देते, ते आम्ही धडाक्याने पार पाडतो', असा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.