Assembly Election 2021: "जर आपण मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर..."; अस्वस्थ काँग्रेस नेत्यांचं मौन सुटलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 03:00 PM2021-05-03T15:00:05+5:302021-05-03T15:00:58+5:30
यानंतर आता पक्षातील काही नेत्यांनीच काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आता या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वाच्या मुद्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Congress)
नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत काँग्रेसला सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करवा लागत आहे. या वेळी काँग्रेसला चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. यातही विशेषतः आसाम आणि केरळमध्ये काँग्रेसला मोठी आशा होती. मात्र, आलेले निकाल पाहता काँग्रेसच्या अडचणी कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच चिन्ह दिसत आहेत. आसाम, केरळ, पदुचेरीतील तथा बंगालमधील पराभव केवळ काँग्रेसच नाही, तर राहुल गांधींनाही मोठा झटका आहे. (Assembly Election 2021 Politics voices are getting stronger about the congress rout in elections)
यानंतर आता पक्षातील काही नेत्यांनीच काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रवक्ता रागिनी नायक यांनीही एक ट्विट करत पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, ''जर आपण (काँग्रेसी) मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर आपल्या पराभवावर आत्म-मंथन कसे करणार?''
यदि हम (कांग्रेसी) मोदी की हार में ही अपनी खुशी ढूंढते रहेंगे, तो अपनी हार पर आत्म-मंथन कैसे करेंगे 🙄
— Dr. Ragini Nayak (@NayakRagini) May 2, 2021
माजी काँग्रेस नेते संजय झा यांनीही पक्षाचे प्रदर्शन आणि निवडणूक निकालांसंदर्भात पक्षाच्या भूमिकेवर निराशा व्यक्त केली आहे. झा यांनी ट्विट करत म्हटले आहे, ''माझ्यासाठी सर्वात मोठी निराशा, काँग्रेसचे पश्चिम बंगालमध्ये आत्मसमर्पण आहे. हे स्वीकारले जाऊ शकत नाही. काँग्रेस 2016 मध्ये, 44 जागा आणि 12.25 टक्के मतांसह सर्वात मोठा विरोधी पक्ष होता.''
The biggest disappointment to me is the West Bengal surrender by the Congress. It is unacceptable. It is now gone the UP/Tamil Nadu way.
— Sanjay Jha (@JhaSanjay) May 2, 2021
In 2016, Congress was the largest opposition party, 44 seats and 12.25% vote share.
Heads must roll.
याच बरोबर, वरिष्ठ अधिवक्ता अखिल सिब्बल यांनी ट्विट केले आहे, की ''मला आश्चर्य वाटते, की काँग्रेस भाजपला हरवल्याबद्दल कधीपर्यंत इतरांचेच अभिनंदन करत राहणार...?''
To lead without accountability is to enjoy the privilege without the responsibility. I wonder how long the Congress will continue thanking others for defeating the BJP?
— Akhil Sibal (@SibalAkhil) May 2, 2021
पुन्हा काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता -
खरे तर रविवारी आलेल्या चार विधानसभा निवडणुकीचे निकाल हे राहुल गांधी आणि काँग्रेससाठी मोठा झटका आहे. यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील असंतुष्ट गटातील नेते काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. केरळमध्येही काँग्रेसला व्यवस्थित पणे एका छताखाली आणण्यास राहुल गांधी अयशस्वी ठरले आहेत. त्याचाही पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूलला बहुमतात आल्याने, आता येणाऱ्या दिवसांत राष्ट्रीय स्थरावर विरोधी पक्षांच्या नेतृत्वात त्यांची दावेदारीही वाढेल. मात्र, राष्ट्रीय स्थरावर काँग्रेसच भाजपला एकमेव पर्याय आहे, असे काँग्रेच्या नेतृत्वाला वाटते. मात्र, आता या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वाच्या मुद्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा -
2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील.
विरोधी पक्षांत ममतांच्या बरोबरचीचं कुणीच नाही -
विरोधी पक्षांत मोठ्या चेहऱ्याचा विचार करता, राहुल गांधींशिवाय, सपा प्रमुख अखिलेश यादव, बीएसपी प्रमुख मायावती, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी, कम्यूनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, अशा अनेक नेत्यांची नावे सांगता येतील. मात्र, यांपैकी कुणीही भाजपचा थेट सामना करण्यास सक्षम दिसत नाही. अशावेळी केवळ एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे ममता बॅनर्जी. ज्या थेट सामन्यात भाजपला पराभूत करताना दिसत आहेत.
राहुल गांधींना स्थापित करण्यासाठी काय करणार सोनिया गांधी? -
सोनिया गांधी या राहुल गांधींना विरोधकांचा मुख्य चेहरा बनविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, ममतांच्या विजयामुळे हे आणखी कठीण होईल असे दिसते. कारण केवळ पश्चिम बंगालच नवहे, तर आसाम, केरळ, पुदुचेरी आणि तामिळनाडूतही विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यांपैकी आसाम, पुदुचेरी आणि केरळमध्येही काँग्रेसला अपयशच आले आहे.
महत्वाचे म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीपासूनच जवळपास प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव होताना दिसत आहे. देशातील अशा राजकीय परिस्थितीत, आता सोनिया गांधी काँग्रेस आणि राहुल गांधींना कशापद्धतीने विरोधी पक्षांचा सर्वमान्य चेहरा बनवून ठेवणार अथवा बनवणार, यासाठी त्या कोणती खेळी खेळणार हेही पाहणे तेवढेच महत्वाचे आहे.