Assembly Election Results 2021: ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 09:48 PM2021-05-02T21:48:52+5:302021-05-02T21:52:28+5:30
Assembly Election Results 2021: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करत ही लढाई सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली: देशभरातील पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, आणि पुदुच्चेरी येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकालांचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांमध्ये भाजपची कहीं खुशी कहीं गम, अशी अवस्था झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असला, तरी आसामचा गड आणि पुदुच्चेरीमध्ये मोठी आघाडी घेण्यात भाजपला यश आले आहे. मात्र, काँग्रेस पक्षाला सर्वच ठिकाणी पराभव पत्करावा लागल्याचे पाहायला मिळत आहे. यावर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करत ही लढाई सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. (assembly election results 2021 congress rahul gandhi reacts on election result in five states)
देशातील पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मागील विधानसभेच्या जागाही राखता आल्याचे पाहायला मिळाले नाही. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली असून, काँग्रेसचा झालेला पराभव स्वीकारला आहे.
We humbly accept the people’s mandate.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 2, 2021
Sincere gratitude to our workers & the millions of people who supported us on the ground.
We will continue to fight for our values and ideals.
Jai Hind.
काय म्हणाले राहुल गांधी?
जनतेच्या निर्णयाचा स्वीकार करतो. निवडणूक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे लाखों आभार मानतो. तसेच काँग्रेसवर ज्यांनी विश्वास दाखवला, त्या सर्वांचेही आभार मानतो. मूल्य आणि आदर्शांची लढाई पुढेही सुरूच राहील. जय हिंद, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट
अशा विजयाचा काहीच फायदा नाही
कोणीही जिंको पण अशा विजयाचा काहीच फायदा नाही. आज लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे. कोणीही जिंको. पण देशाचं प्रचंड नुकसान होत आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम, पण...; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
दरम्यान, भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दोन दिवसांपूर्वी मतदान संपल्यानंतर आलेले एक्झिट पोल्सचे आकडे हेच दाखवत होते. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एकहाती लढत देत भाजपचे सत्ताबदलाचे मनसुबे धुळीस मिळवले. ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष सध्या २०० पेक्षा अधिक मतदारसंघांत आघाडीवर असल्यानं सर्व एक्झिट पोल्स चुकले आहेत. एकाही एक्झिट पोल्सनं ममतांच्या पक्षाला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील आणि भाजप १०० च्या खाली राहील असा अंदाज वर्तवलेला नव्हता.