भाजपमध्ये जाण्याच्या शक्यतांना ब्रेक?; काँग्रेस नेते कमलनाथ यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 03:43 PM2024-02-10T15:43:34+5:302024-02-10T15:45:02+5:30

कमलनाथ हे काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

chances of joining BJP The post written by Congress leader Kamal Nath is gone viral | भाजपमध्ये जाण्याच्या शक्यतांना ब्रेक?; काँग्रेस नेते कमलनाथ यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

भाजपमध्ये जाण्याच्या शक्यतांना ब्रेक?; काँग्रेस नेते कमलनाथ यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

Congress Kamal Nath ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षानंतर आता जयंत सिंह यांच्या नेतृत्वाखालील आरएलडी पक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. अशातच मध्य प्रदेशातहीकाँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आज कमलनाथ यांनी काँग्रेसच्या विचारधारेबाबत पोस्ट लिहीत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेस नेते कमलनाथ यांनी आज एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "काँग्रेसची विचारधारा सत्य, धर्म आणि न्यायाची विचारधारा आहे. देशातील सर्व धर्म, जाती, प्रदेश, भाषा आणि विचारांना काँग्रेसच्या विचारधारेत समान स्थान आहे. काँग्रेसच्या १३८ वर्षांच्या इतिहासातील बहुतांश काळ हा संघर्ष आणि सेवेत गेला आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनावेळी हुकूमशाहीविरोधात संघर्ष करण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये स्पर्धा लागली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रनिर्माण करणं हेच काँग्रेसचं एकमेव ध्येय आहे. आज जेव्हा देशात विरोधी पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे तेव्हा काँग्रेसचीच विचारधारा हुकूमशाहीचा विरोध करणार आहे आणि देशाला जगातील सर्वांत सुंद आणि मजबूत लोकशाही बनवणार आहे. आम्ही गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या मार्गाने चालत बलशाली भारत निर्माण करू," अशा शब्दांत कमलनाथ यांनी काँग्रेसच्या विचारधारेचा पुरस्कार केला आहे.

दरम्यान, कमलनाथ यांची गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. तसंच त्यांना आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ यांना भाजपकडून राज्यसभेवर संधी दिली जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आज कमलनाथ यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर भाष्य करत अप्रत्यक्षरित्या विद्यमान सरकारवर टीकास्त्र सोडल्याने ते तूर्तास काँग्रेसमध्येच राहण्याच्या विचारात असल्याचं दिसत आहे.


 

Web Title: chances of joining BJP The post written by Congress leader Kamal Nath is gone viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.