...'अशी' एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे; राहुल गांधींनी जीवलग मित्रावर दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 05:47 PM2020-03-11T17:47:21+5:302020-03-11T17:53:04+5:30

नरेंद्र मोदींनी मला देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाचे आभार मानले आहे.

Congress Leader Rahul Gandhi said that the only person who could come to my house at any time it was jyotiraditya scindia mac | ...'अशी' एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे; राहुल गांधींनी जीवलग मित्रावर दिली प्रतिक्रिया

...'अशी' एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे; राहुल गांधींनी जीवलग मित्रावर दिली प्रतिक्रिया

googlenewsNext

नवी दिल्ली:  मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा देखील व्यासपीठावर उपस्थित होते. कमलनाथ सरकारने घोर निराशा केल्याचे सांगत ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

ब्रेकिंग! ज्योतिरादित्य शिंदेच्या हाती 'कमळ'; मध्य प्रदेशात भाजपाला मोठं बळ

ज्योतिरादित्य शिंदे गेल्या अनेक महिन्यांपासून नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली होती. मात्र राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटण्याची वेळ दिली नाही, असा दावा त्रिपुरामधील काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रद्योत माणिक्य देववर्मा यांनी केला होता. मात्र प्रद्योत माणिक्य देववर्मा यांचा हा दावा राहुल गांधी यांनी फेटाळून लावला आहे.

'महाविकास आघाडीचा मोठा नेता संपर्कात; महाराष्ट्रातही लवकरच राजकीय भूकंप'

मध्य प्रदेशात मंगळवारपासून सुरु असलेल्या राजकीय हालचालींवर राहुल गांधी यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु माध्यमांनी जेव्हा राहुल गांधींना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारल्यावर याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधी म्हणाले की, मी आणि ज्योतिरादित्य चांगले मित्र आहे. तसेच आम्ही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. माझ्या घरी कुठल्याही वेळी येऊ शकले अशी एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.


दरम्यान, देशाच्या इतिहासात भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला जनादेश आजवर कुणालाही मिळालेला नाही. भारताचं भविष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सुरक्षित आहे. त्यांनी भारताचं नाव जगात पोहचवलं आहे. मोदींनी मला देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाचे आभार मानले आहे.

काँग्रेसमध्ये नवं नेतृत्व मान्यच होत नाही; ज्योतिरादित्य शिंदेंचा 'गांधीगिरी'वर निशाणा

ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत

'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले

राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप

...म्हणून आजचा दिवस ज्योतिरादित्य सिंधियांसाठी खास; लवकरच धरणार भाजपचा 'हात'

आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार

Web Title: Congress Leader Rahul Gandhi said that the only person who could come to my house at any time it was jyotiraditya scindia mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.