राहुल गांधींच्या ट्विटनं आमच्या धोरणांचं उल्लंघन; Twitter नं दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 04:20 PM2021-08-11T16:20:28+5:302021-08-11T16:21:03+5:30

राहुल गांधींवर दिल्लीतील अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची ओळख सोशल मीडियावर उघड केल्याचा आरोप आहे. (Rahul Gandhi)

Congress leader Rahul Gandhi tweet violated our policy, Twitter informs delhi HC | राहुल गांधींच्या ट्विटनं आमच्या धोरणांचं उल्लंघन; Twitter नं दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं...

राहुल गांधींच्या ट्विटनं आमच्या धोरणांचं उल्लंघन; Twitter नं दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं...

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान, ट्विटरनेदिल्ली उच्च न्यायालयात म्हटले आहे, की राहुल गांधींच्या ट्विटने आमच्या धोरणाचे उल्लंघन केले आहे. राहुल गांधींवर दिल्लीतील अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची ओळख सोशल मीडियावर उघड केल्याचा आरोप आहे. (Congress leader Rahul Gandhi tweet violated our policy, Twitter informs delhi HC)

ट्विटरने बुधवारी उच्च न्यायालय सांगितले, की दिल्लीच्या कँट भागात अत्याचार झालेल्या 9 वर्षांच्या मुलीच्या आई वडिलांचा फोटो शेअर करणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे ट्विट हटविण्यात आले आहे. तसेच नियमांकडे दुर्लक्ष केल्याने गांधी यांचे टि्वटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. सरन्यायाधीश डीएन पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठा समोर एका जनहित याचिकेच्या उत्तरात ट्विटरने ही माहिती दिली आहे.

संबंधित पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख ट्विटरच्या माध्यमाने उघड केल्याबद्दल, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि पोलिसांना राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. राहुल गांधी हे दिल्लीतील नांगल गावात  अत्याचार झालेल्या 9 वर्षांच्या दलित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि त्यांनी त्यावेळचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता.

याचिकेत सामाजिक कार्यकर्ते मकरंद सुरेश म्हाडलेकर यांनी आरोप केला आहे की, राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाचे फोटो शेअर करून बाल न्याय कायदा आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. दोन्ही कायद्यांत, अत्याचार झालेल्या मुलांची ओळख उघड केली जाऊ शकत नाही, असे म्हणण्यात आले आहे.

Web Title: Congress leader Rahul Gandhi tweet violated our policy, Twitter informs delhi HC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.