काॅंग्रेस देणार ५० टक्के महिला मुख्यमंत्री, ऱाहुल गांधींचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 06:57 AM2023-12-02T06:57:13+5:302023-12-02T06:57:48+5:30
Rahul Gandhi: पुढील १० वर्षांमध्ये आमच्या ५० टक्के महिला मुख्यमंत्री असाव्यात, असे पक्षाचे लक्ष्य असायला हवे, असे मत काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
काेची - काॅंग्रेसची सत्ता असलेल्या एकाही राज्यात महिला मुख्यमंत्री नाही. मात्र, पक्षात मुख्यमंत्रिपदाची क्षमता आणि गुण असलेल्या अनेक महिला आहेत. पुढील १० वर्षांमध्ये आमच्या ५० टक्के महिला मुख्यमंत्री असाव्यात, असे पक्षाचे लक्ष्य असायला हवे, असे मत काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. काेची येथे केरळ महिला काॅंग्रेसच सम्मेलनाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बाेलत हाेते.
महिला आरक्षण विधेयकावरून टीकास्त्र
संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. त्याचे कायद्यातही रुपांतर झाले. मात्र, त्याची अंमलबजावणी १० वर्षांनी हाेणार आहे. मी प्रथमच संसदेत असे विधेयक मंजूर हाेताना पाहिले. कायदा मंजूर झाल्यानंतरही विधेयकाची अंमलजबावणी राेखल्याची टीका राहुल गांधी यांनी भाजपवर केली.
राहुल गांधी यांनी केरळमध्ये राज्य महिला काॅंग्रेस अधिवेशनाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांना त्यांचे वडील स्व. राजीव गांधी आणि आई साेनिया यांचे एक छायाचित्र भेट म्हणून देण्यात आले.