गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच; प्रियंका यांना भेटून परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 10:23 AM2019-05-29T10:23:41+5:302019-05-29T10:25:32+5:30
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पाटलय राहुल यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र राहुल यांनी या दोन्ही नेत्यांना भेटण्यास वेळ दिला नाही. दोन्ही नेत्यांना केवळ काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेता आली.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्यावर ठाम असून यासंदर्भात अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. काँग्रेस नेत्यांनी त्यांना अध्यक्षपदी राहण्यासाठी तयार केल्याचे वृत्त आले होते. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्र वेगळच आहे. राहुल अजुनही राजीनाम्यावर ठाम आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पाटलय राहुल यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र राहुल यांनी या दोन्ही नेत्यांना भेटण्यास वेळ दिला नाही. दोन्ही नेत्यांना केवळ काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेता आली. यावरून राहुल गांधी राजस्थानच्या काँग्रेस नेत्यांवर नाराज असल्याचे दिसून येते. याआधी राहुल यांनी गहलोत यांना भेटण्यासाठी वेळ दिला होता, परंतु भेट घेतली नव्हती.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आयोजित काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गहलोत, कमलनाथ आणि पी. चिदंबरम यांचे कान टोचले होते. लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांनी कुटुंबातील उमेदवारांना अधिक प्राधान्य दिल्याचे राहुल यांनी म्हटले होते. त्याच बैठकीत राहुल यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता.