गरीबांना वेतनानंतर राहुल गांधी यांनी महिलांना दिले मोठे आश्वासन, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 07:23 PM2019-01-29T19:23:05+5:302019-01-29T19:26:54+5:30

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांनाही मोठे आश्वासन दिले आहे.

If we come to power, we will pass the Women's Reservation Bill - Rahul Gandhi | गरीबांना वेतनानंतर राहुल गांधी यांनी महिलांना दिले मोठे आश्वासन, म्हणाले... 

गरीबांना वेतनानंतर राहुल गांधी यांनी महिलांना दिले मोठे आश्वासन, म्हणाले... 

ठळक मुद्दे2019 साली सत्तेत आल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये पारित करून घेऊमहिलांच्या नेतृत्वाला राजकीय क्षेत्रात वरच्या पातळीवर आणण्याची आमची इच्छा लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी महिला आरक्षण विधेयकात तरतूद

कोचिन -  2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांनाही मोठे आश्वासन दिले आहे. 2019 साली सत्तेत आल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महिलाआरक्षण विधेयक संसदेमध्ये पारित करून घेऊ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

कोचिन येथे बुथ कार्यकर्त्यांशी चर्चा करताना राहुल गांधी यांनी सांगितले की, ''2019 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सर्वप्रथम आम्ही संसदेत महिला आरक्षण विधेयक पारित करून घेऊ. महिलांच्या नेतृत्वाला राजकीय क्षेत्रात वरच्या पातळीवर आणण्याची आमची इच्छा आहे.'' एका कार्यकर्त्याने दिलेल्या सल्ल्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ही घोषणा केली.



 

महिला आरक्षण विधेयक गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी या विधेयकात तरतूद आहे. मात्र राजकीय एकमत होऊ न शकल्याने हे विधेयक अद्याप पारित झालेले नाही. 

दरम्यान,  राहुल गांधी यांनी कोचिन येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जवळच्या 15 मित्रांना कमाल उत्पन्न गॅरंटी दिली असून शेतकऱ्यांना मात्र फसविले आहे. तुम्ही अनिल अंबानी असाल तर या योजनेचा लाभ मिळेल. या उलट काँग्रेस किमान उत्पन्न योजना आणली असून ही योजना सर्व भारतीयांसाठी लागू होईल. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षांत एकच काम केले, ते म्हणजे एका मागोमाग एक खोटे बोलणे. यामुळे देशाचा वेळ वाय़ा गेला. तरणांना 2 कोटी रोजगार उपलब्ध करण्याचेही आश्वासन त्यांनी दिलेले. किती जणांना रोजगार मिळाले ही आकडेवारीच समोर आली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: If we come to power, we will pass the Women's Reservation Bill - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.