मोदी, योगी, शहांवर एकटे राहुल गांधी पडले भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 06:26 IST2018-12-14T05:07:56+5:302018-12-14T06:26:34+5:30
पक्षाचा विजय हा सांघिक असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत असले तरी निवडणुकांच्या सामन्याचे खरे मॅन ऑफ द मॅच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हेच ठरले.

मोदी, योगी, शहांवर एकटे राहुल गांधी पडले भारी
- योगेश पांडे
रायपूर : छत्तीसगडमध्ये गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या डॉ. रमण सिंग यांना अखेर मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. पक्षाचा विजय हा सांघिक असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत असले तरी निवडणुकांच्या सामन्याचे खरे मॅन ऑफ द मॅच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हेच ठरले.
राहुल गांधी यांच्या १७ प्रचार सभा व २ रोड शो झाले. या १७ सभा झालेल्या जागा तसेच आजूबाजूच्या जागांवर काँग्रेसला चांगलेच यश मिळाले आहे. रायपूर, कांकेर, डोंगरगड, महासमुंद, खरसिया, कोरबा, बिलासपूर, कवर्धा, दुर्ग शहर, दुर्ग ग्रामीण, जगदलपूर, कोंडागाव, भरतपूर, मनेंद्रगड, बैकुठपूर येथे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. रायपूरमधील तीन जागांवरही काँग्रेसच विजयी झाली.