मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर राहुल गांधी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:04 PM2020-03-11T12:04:45+5:302020-03-11T12:05:31+5:30

जगभरात थैमान घालत असलेल्या कोराना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिजेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या घडामोडींचा धागा पकडून राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

Modiji Could you please pass on the benefit to Indians of crash in global oil prices says Rahul Gandhi | मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर राहुल गांधी म्हणतात...

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर राहुल गांधी म्हणतात...

Next

नवी दिल्ली - काठावरचे बहुमत मिळवत मध्यप्रदेशात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत राजीनामे दिले आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. राज्यपालांच्या कार्यालयाने 19 आमदारांचे राजीनामे मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. या घडामोडी घडत असताना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. 

पीएमओला उद्देशून राहुल यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात की, मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात मोदीजी तुम्ही पेट्रोल-डिजेलच्या दरात जागतीक पातळीवर 35 टक्क्यांनी झालेली घसरण विसरून गेला आहेत. भारतात पेट्रोल-डिजेलचे दर 60 रुपयांपेक्षा कमी करून दर कोसळण्याच्या भारतीयांना  फायदा मिळवून द्याल का, असा सवाल राहुल यांनी मोदी सरकारला केला आहे. तसेच इंधनाचे दर कोसळल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असंही राहुल यांनी म्हटले. 

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला. शिंदे यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनामे दिल्यानं राज्यातलं काँग्रेस सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात जोरदार सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या एका दाव्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसरीकडे जगभरात थैमान घालत असलेल्या कोराना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिजेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या घडामोडींचा धागा पकडून राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

Web Title: Modiji Could you please pass on the benefit to Indians of crash in global oil prices says Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.