मोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 06:15 AM2018-12-12T06:15:42+5:302018-12-12T06:16:34+5:30
लोकांच्या मनात काय चालले आहे, याकडे मोदींनी दुर्लक्ष केले. शिवाय सरकार, मंत्री व पक्ष अतिशय अहंकाराने वागू लागले. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांत भाजपाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हणाले.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षांत अनेक चांगली कामे करून दाखविण्याची संधी असताना त्यांनी ती घालवली. लोकांच्या मनात काय चालले आहे, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. शिवाय सरकार, मंत्री व पक्ष अतिशय अहंकाराने वागू लागले. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांत भाजपाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हणाले.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ते म्हणाले की, देशापुढे रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार निर्मूलन हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते मोदी यांनी मांडले होते, पण त्या प्रश्नावर प्रत्यक्षात काहीच केले नाही. त्यामुळे हेच मुद्दे घेऊन आम्ही पुढील काळात काम करणार आहोत. मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जनतेला फक्त स्वप्ने दाखविली. ती पूर्ण न केल्याने जनतेने भाजपाला पराभूत केले.
आम्ही आश्वासनानुसार शेतकºयांना देणार आहोत. कर्जमाफी हा उपाय नसून ती एक तात्पुरती, पण आवश्यक मदत आहे अशीच आमची भूमिका आहे. मला २०१४च्या लोकसभा निवडणुकांतून खूप शिकायला मिळाले. येत्या लोकसभा निवडणुकांत विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपाविरोधात मजबूत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सपा, बसपा व काँग्रेसची विचारसरणी समानच आहे. अन्य विरोधकांनीही या आघाडीत सामील व्हावे, असा प्रयत्न आहे. तो यशस्वी झाल्यास भाजपाचा पराभव आम्ही नक्की करू शकतो. काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे आमच्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे. त्या दृष्टीने आम्ही देशापुढे एक नवा कार्यक्रम ठेवणार आहोत, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले.