Bharat Jodo Yatra: “भारतात पसरवल्या जात असलेल्या द्वेष, हिंसा व भिती विरोधात भारत जोडो यात्रा!”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 05:48 PM2022-11-23T17:48:54+5:302022-11-23T17:49:49+5:30

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात दाखल झाल्यावर नाना पटोले यांनी बुऱ्हाणपूर येथे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांच्याकडे तिरंगा सोपवला.

rahul gandhi again criticised bjp and modi govt after bharat jodo yatra entered in madhya pradesh | Bharat Jodo Yatra: “भारतात पसरवल्या जात असलेल्या द्वेष, हिंसा व भिती विरोधात भारत जोडो यात्रा!”: राहुल गांधी

Bharat Jodo Yatra: “भारतात पसरवल्या जात असलेल्या द्वेष, हिंसा व भिती विरोधात भारत जोडो यात्रा!”: राहुल गांधी

googlenewsNext

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राने खूप चांगले नियोजन आणि आयोजन केले त्यासाठी त्यांना A+ गुण दिले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने मोठा पाठिंबा दिला. १४ दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. महाराष्ट्रातून सर्व देशात संदेश गेला आहे. आता मध्य प्रदेशात ३७० किलोमीटरची पदयात्रा करून पुढचा प्रवास करत श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवणार, याला कोणीही रोखू शकत नाही. भारतात द्वेष, हिंसा आणि भिती पसरवली जात आहे याविरोधात ही भारत जोडो यात्रा आहे, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे.

भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवेश केला. यावेळी बोरडेली जिल्हा बुऱ्हाणपूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलनाथ यांच्याकडे तिरंगा सोपवला. हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. भाजप सरकार लोकांमध्ये भिती निर्माण करत आहे. शेतमालाला योग्य भाव न देऊन तसेच पीक विम्याची नुकसान भरपाई न देऊन शेतक-यांना घाबरवले जात आहे. कामगारांना मनरेगाचे काम न देऊन भिती निर्माण केली जात आहे. शेतकरी, कामगार, महिलांच्या मनातून ही भिती काढली पाहिजे. कोणालाही घाबरू नका हे सांगण्यासाठीच ही पदयात्रा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

हा अन्याय करणारा हिंदुस्थान आहे आणि तो आपणास नको

या पाच वर्षाच्या रुद्रला डॉक्टर व्हायचे आहे, याने तसे स्वप्न पाहिले आहे, त्यासाठी तो शिक्षण घेईल, डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेईल पण आजच्या हिंदुस्थानात रुद्रचे स्वप्न साकार होणार नाही कारण रुद्रसारख्या असंख्य मुलांना मी भेटलो त्यांच्या व्यथा ऐकल्या आहेत. शिक्षण संस्था खाजगी झाल्या आहेत. शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात पण एवढे करुनही तो डॉक्टर बनू शकत नाही दुसरेच काही तरी काम त्याला करावे लागेल. चार-पाच मोजक्या उद्योगपतींच्या हातात सर्व यंत्रणा दिली आहे, हा अन्याय करणारा हिंदुस्थान आहे आणि तो आपणास नको आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

दरम्यान, युपीएचे सरकार होते तेव्हा ४०० रुपये गॅस सिलिंडर होता आज १२०० रुपये झाला आहे, पेट्रोल ६० रुपये लिटर होते आज १०७ रुपये झाले आहे, हा सर्व पैसा कोणाच्या खिशात जात आहे? हा सवाल करत आम्ही ‘मन की बात’ करत  नाही, लोकांची ‘मन की बात’ ऐकतो, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: rahul gandhi again criticised bjp and modi govt after bharat jodo yatra entered in madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.