'मोदी आडनाव मानहानी प्रकरण ते नॅशनल हेराल्ड...' राहुल गांधींविरोधात इतके खटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 01:41 PM2023-07-07T13:41:18+5:302023-07-07T13:41:44+5:30

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

Rahul Gandhi Defamation Cases: 'Modi surname defamation case to National Herald' So many cases filed against Rahul Gandhi | 'मोदी आडनाव मानहानी प्रकरण ते नॅशनल हेराल्ड...' राहुल गांधींविरोधात इतके खटले

'मोदी आडनाव मानहानी प्रकरण ते नॅशनल हेराल्ड...' राहुल गांधींविरोधात इतके खटले

googlenewsNext

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) 'मोदी' आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुजरातउच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. आता राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत आणि त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाच्या निलंबनाविरोधात अपीलही करू शकणार नाहीत. दरम्यान, मोदी आडनावाव्यतिरिक्त, राहुल गांधी यांच्यावर अर्धा डझनहून अधिक मानहानीच्या खटले आहेत, त्यापैकी बहुतांश भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी दाखल केले आहेत. 

'मोदी आडनाव' प्रकरण
ताजे प्रकरण मोदी आडनावाचे आहे. भाजप नेते पूर्णेश मोदी यांच्या तक्रारीवरून, सुरतच्या सेशन कोर्टाने राहुल गांधींना 'मोदी आडनाव' टिप्पणीसाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गुजरातउच्च न्यायालयाने हा आदेश कायम ठेवला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींनी आपल्या भाषणात मोदी आडनावावर भाष्य केले होते.

पाटणा उच्च न्यायालयात प्रकरण
मोदी आडनावाशी संबंधित आणखी एक खटला राहुल गांधींविरोधात पाटणा उच्च न्यायालयात सुरू आहे. हा गुन्हाही भाजप नेत्याच्या वतीने दाखल करण्यात आला आहे.

अहमदाबादमधील सहकारी बँकेशी संबंधित प्रकरण
2016 मध्ये नोटाबंदीच्या काळात राहुल गांधी यांनी अहमदाबादच्या सहकारी बँकेवर 750 कोटी रुपयांच्या चलन विनिमय घोटाळ्याचा आरोप केला होता. यावर बँकेने अहमदाबाद येथील न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.

गौरी लंकेश प्रकरण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) बंगळुरूस्थित पत्रकार गौरी लंकेश यांच्या मृत्यूप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात मुंबई न्यायालयात खटला दाखल केला होता. 2019 मध्ये त्यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध भाजप-आरएसएसच्या विचारसरणीशी जोडणारे विधान केले होते. या प्रकरणी त्यांना मुंबई न्यायालयातून जामीन मिळाला आहे.

गुवाहाटी कोर्टात मानहानीचा खटला
गुवाहाटी कोर्टात राहुलविरोधात मानहानीचा आणखी एक गुन्हा दाखल आहे. हे प्रकरणही आरएसएसनेच दाखल केले आहे. एका निवेदनात राहुल गांधी यांनी 2015 मध्ये आसाममधील बारपेटा अधिवेशनात सहभागी होण्यापासून रोखल्याचा आरोप आरएसएसवर केला होता. या वक्तव्यावरून त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरएसएसला महात्मा गांधींचा मारेकरी म्हटले 
2016 मध्ये आरएसएसने राहुल गांधींवर आणखी एक खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी आरएसएसला जबाबदार धरणारे वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

नॅशनल हेराल्ड केस
याशिवाय राहुल गांधींविरोधात नॅशनल हेराल्ड खटलाही सुरू आहे, ज्यामध्ये त्यांची आई सोनिया गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2015 मध्ये हा खटला दाखल केला होता.

Web Title: Rahul Gandhi Defamation Cases: 'Modi surname defamation case to National Herald' So many cases filed against Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.