'नथुराम गोडसे देशभक्त होता'; उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 08:31 AM2023-06-08T08:31:48+5:302023-06-08T08:36:11+5:30
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी बुधवारी नथुराम गोडसेच्या संदर्भात मोठं विधान केलं आहे.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी बुधवारी नथुराम गोडसेच्या संदर्भात मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. 'मी नथुराम गोडसेला जेवढे ओळखले आणि वाचले आहे, तो सुद्धा देशभक्त होता', असं मोठं विधान त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलं. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रावत म्हणाले, 'गांधीजींची हत्या हा वेगळा मुद्दा आहे. मी गोडसेला जेवढे ओळखले आणि वाचले आहे, तो सुद्धा देशभक्त होता. गांधीजींची हत्या आम्हाला मान्य नाही.
यावेळी रावत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. रावत म्हणाले, त्यांची विचारधारा फक्त गांधी आडनावाने गांधीवादी होत नाही. ते फक्त बोलतात. राहुल गांधी हे गांधींच्या नावाचा रोख घेत असल्याचा आरोप रावत यांनी केला. राहुल गांधी यांनी अमेरिकेत नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रावत म्हणाले की, काँग्रेस नेत्याच्या प्रयत्नांचा पक्षाला फायदा होणार नाही आणि लवकरच काँग्रेस भूतकाळातील गोष्ट होईल, असंही रावत म्हणाले.
रावत म्हणाले, 'राहुल गांधी आपल्या पक्षाची वाईट अवस्था पाहून हताश होऊन बोलत आहेत. ते मानसिक तणावाखाली बोलत आहेत. मानसिक तणावातून जात असलेल्या व्यक्तीला जनता स्वीकारणार नाही, असा टोला लगावला.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी केलेल्या भेटीबाबत रावत म्हणाले, ''दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा नौटंकी नेता या देशात कोणी नाही. अखिलेश यादव यांना केजरीवाल यांच्याकडून नाटकाचा दर्जा शिकायचा आहे.