राहुल गांधी टिळक भवनात साधणार काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद; शुक्रवारी दुपारनंतर देणार भेट
By नारायण जाधव | Published: August 28, 2023 06:23 PM2023-08-28T18:23:26+5:302023-08-28T18:23:53+5:30
दोन दिवस देशभरातील इंडिया आघाडीचे नेते मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मुक्काला राहणार आहेत.
नवी मुंबई : देशातील प्रमुख २७ पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे देशातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या दौर्यात राहुल गांधी मुंबईतील टिळक भवन या काँग्रेसच्या राज्य मुख्यालयाला भेट देऊन राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत.
दोन दिवस देशभरातील इंडिया आघाडीचे नेते मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मुक्काला राहणार आहेत. यात नितिशकुमार, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांच्यासह ६ मुख्यमंत्री, विविध पक्षांचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खा. सोनिया गांधी, हेही उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात ३१ ऑगस्टला सर्व नेत्यांचे आगमन होणार असून रात्रीचे भोजन शिवसेना नेेते उद्धव ठाकरे हे देणा आहेत. दौर्यात राहुल गांधी हे १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीच्या लागोचे अनावरण आणि पत्रकार संपल्यानंतर थेट मुंबईतील टिळक भवन या काँग्रेसच्या राज्य मुख्यालयाला भेट देऊन राज्यातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार असल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.
तीन विमानतळावर येणार इंडिया आघाडीचे नेते
मुंबईतील टर्मिनल १ आंतरदेशीय, टर्मिनल २ आंतरराष्ट्रीय आणि टर्मिनल ८ खासगी आणि विशेष विमाने उतरणारी धावपट्टी अशा तीन विमानतळांवर इंडिया आघाडीचे नेते येणार आहेत. यासाठी प्रत्येक विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी निवडक आणि महत्त्वाच्या नेत्यांची नियुक्ती केली आहे.