Best Destination Wedding Locations on a Budget
कमी बजेटमध्ये डेस्टीनेशन वेडींग करण्यासाठी 'ही' ठिकाणं आहेत परफेक्ट By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 03:27 PM2018-10-08T15:27:13+5:302018-10-08T15:56:27+5:30Join usJoin usNext लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याने प्रत्येकानेच त्यासाठी काही स्वप्न रंगवलेली असतात. सध्या डेस्टीनेशन वेडींग करण्याकडे तरुणाईचा कल अधिक वाढला आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये डेस्टीनेशन वेडींग करण्यासाठी असलेल्या काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. समुद्र किनारी लग्न करण्यासाठी तुम्ही जर उत्सुक असाल तर अलिबाग हे उत्तम ठिकाण आहे. गोव्याला जाण्यापेक्षा मुंबईपासून केवळ दोन तासाच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी तुमचं बीच डेस्टिनेशन वेडींगचं स्वप्न सहज साकार होऊ शकतं. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील मांडू हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी अनेक किल्ले आणि उंच पर्वत रांगा असल्याने डेस्टीनेशन वेडींगसाठी हे ठिकाण उत्तम आहे. निसर्गसौर्द्यांनी नटलेलं केरळ सर्वांनाच भुरळ पाडतं. त्यामुळेच केरळमधील अलेप्पी हे ठिकाण डेस्टीनेशन वेडींगसाठी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क अत्यंत सुंदर पर्याय आहे. उत्तराखंडमध्ये असलेले हे पार्क सुंदर आहे. तसेच येथे तुम्ही तुम्हाला हवं तशी सजावट करू शकता. लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांना निसर्गाचा आनंद घेता येईल. राजस्थानमधील पुष्कर हे प्राचीन शहरांपैकी एक प्रसिद्ध शहर आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये रॉयल वेडींगचा अनुभव घेऊ इच्छित असाल तर पुष्कर सारखं दुसरं सुंदर शहर नाही. पुष्करमधील ऐतिहासिक हवेली तुमचं डेस्टीनेशन वेडींग खास करतील.टॅग्स :पर्यटनअलिबागमध्य प्रदेशकेरळtourismalibaugMadhya PradeshKerala