Congress leader Jyotiraditya Shinde has a large palace on 40 acres in Gwalior mac
400 आलिशान खोल्या, जेवण वाढायला चांदीची ट्रेन; ज्योतिरादित्यांच्या राजमहालाची बातच न्यारी By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 08:15 PM2020-03-10T20:15:14+5:302020-03-10T20:57:40+5:30Join usJoin usNext गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाच राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप आला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या एका राजीनाम्याने मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार संकटात आणणारे ज्योतिरादित्य शिंदे ग्वालियरमधील शिंदे कुटुंबीयांशी संबंधित आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचा जन्म 1 जानेवारी 1971 साली झाला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना राजकारणाशिवाय शूटिंग, क्रिकेट आणि कार रेसिंगची मोठ्या प्रमाणात आवड आहे. 12 डिसेंबर 1994 रोजी प्रियदर्शनी राजे शिंदे यांच्याशी ज्योतिरादित्य शिंदे यांचा विवाह झाला आहे. तसेच प्रियदर्शनी शिंदे यांचा जगातील 50 सर्वात सुंदर महिलांच्या यादीत समावेश होता. प्रियदर्शनी बडोदामधील गायकवाड घराण्याच्या राजकुमारी आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मुलाने देहरादूनमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. सध्या तो अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहेत. मुलगी अनन्याचा दिल्लीमधील ब्रिटीश स्कूलमध्ये ती शिक्षण घेत आहे. वडिलांप्रमाणे अनन्यालाही घोडेस्वारी आणि साहसी खेळांची आवड आहे. राजघराणं आणि राजकीय पार्श्वभूमी असलेलं कुटुंब असल्याने ज्योतिरादित्य शिंदे यांना लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती. वडील माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे सक्रीय राजकारणात आले. फेब्रुवारी 2002 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवत ज्योतिरादित्य शिंदे लोकसभेत पोहोचले. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला होता. केंद्रात मनमोहन सिंग सरकार असताना 28 ऑक्टोबर 2012 ते 25 मे 2014 पर्यंत ज्योतिरादित्य शिंदे केंद्रीय मंत्री पदाचा कारभार सांभाळला होता. राजघराण्याशी संबंधित असल्याने ज्योतिरादित्य शिंदे यांची जीवनशैली अगदी स्वप्नवत आहे. ग्वालियरमध्ये 40 एकर परिसरात ज्योतिरादित्य शिंदे यांचा भव्य दिव्य राजमहालआहे. 1874 मध्ये युरोपिअन शैलीत उभारण्यात आलेल्या या राजमहालाचं नाव जयविलास पॅलेस आहे. या राजमहालात तब्बल 400 खोल्या असून 40 खोल्यांमध्ये म्युझिअम आहे. गेल्या 140 वर्षांपासून या महालाच्या छताला 3500 किलोचे दोन झुंबर लावलेले आहेत. बेल्जिअमच्या कामगारांकडून हे झुबंर तयार करण्यात आले. नाइटहूड म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या मायकल फिलोसे यांनी हा राजमहल उभारला होता. राजमहलात इतक्या वजनाचे झूमर लावण्याआधी मायकल फिलोसे यांनी किती वजन झेपू शकतं हे तपासण्यासाठी छतावर हत्ती चढवले होते अशी माहिती सांगण्यात येते. राजमहालाच्या डायनिंग हॉलमध्ये चांदीची ट्रेन असून या चांदीच्या ट्रेनच्या सहाय्यानेच जेवण वाढलं जातं महाराष्ट्रातील श्रीगोंदा येथे देखील ज्योतिरादित्य शिंदे यांची 19 एकर आणि लिंबण गावात 53 एकर जमीन आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 32 कोटी 64 लाख 18 हजार 412 कोटींची संपत्ती आहे.टॅग्स :काँग्रेसमध्य प्रदेशमहाराष्ट्रभाजपाcongressMadhya PradeshMaharashtraBJP