Historic political day; When Indira Gandhi was expelled from the Congress
ऐतिहासिक राजकीय दिवस; जेव्हा इंदिरा गांधी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली, तेव्हा... By प्रविण मरगळे | Published: November 12, 2020 12:30 PM2020-11-12T12:30:23+5:302020-11-12T12:34:51+5:30Join usJoin usNext स्वातंत्र्यकाळापासून देशात काँग्रेस हा सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष आहे, सध्या या पक्षाची राजकीय धुरा सोनिया गांधी यांच्या हातात आहे, अनेक वर्ष देशाची, राज्यांची सत्ता काँग्रेसकडे होती, मात्र अलीकडच्या निवडणुकीत काँग्रेसला यशासाठी झगडावं लागत आहेत. नुकत्याच बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसला १९ जागा मिळाल्या, अनेक राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसला यशस्वी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे काँग्रेसमधील राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. त्यातच काही नेत्यांनी सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदी राहावं असं पत्रही लिहिलं होतं. काँग्रेस आणि गांधी कुटुंब हे समीकरण सध्या राजकारणात दिसून येतं, मात्र इतिहासात डोकावून पाहिलं तर इंदिरा गांधीसारख्या नेत्याचीही काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केल्याची नोंद आहे. ही घटना १९६९ मधील आहे. त्यावेळी इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी या पंतप्रधान असल्या तरी काँग्रेसमध्ये काही वयोवृद्ध नेत्यांचं वर्चस्व कायम राहिलं होतं. राम मनोहर लोहिया यांच्या शब्दात इंदिरा गांधींची भूमिका 'मुकी बाहुली'पेक्षा जास्त नव्हती. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी यांचं ऐकणारे फारच कमी होते. त्यावेळी व्हीव्ही गिरी यांना राष्ट्रपती बनवण्याची इंदिराजींची इच्छा होती पण पक्षात कार्यरत असणाऱ्या गटाने नीलम संजीव रेड्डी यांना राष्ट्रपतीपदाचं उमेदवार घोषित केले. मग इंदिरा गांधींनी बंड केले आणि रेड्डी पराभूत झाले. मोरारजी देसाई यांना अर्थमंत्रिपदावरून काढल्यापासून हा गट इंदिरा गांधींवर नाराज होता. नीलम रेड्डीच्या पराभवामुळे तो काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा गट अधिकच अस्वस्थ झाला. पंतप्रधानांनी पक्षाच्या नेत्याला पाठिंबा नाही दिला तर कोण देणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष एस. निजलिंगप्पा यांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू झाली. इंदिरा गांधी यांनी वेगवेगळ्या राज्यात जाऊन कॉंग्रेसवाल्यांना त्यांच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत होती. नवीन अध्यक्ष निवडून यावेत यासाठी इंदिरा समर्थकांनी कॉंग्रेसच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली. याच रागात निजलिंगप्पा यांनी इंदिराजींना एक खुलं पत्र लिहिले निजलिंगप्पा यांनी लिहिलेल्या पत्रात इंदिरा गांधींवर पक्षाअंतर्गत लोकशाही संपुष्टात आल्याचा आरोप केला. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की, इंदिरा गांधींनी निजलिंगप्पा यांनी बोलावलेल्या बैठकांना जाणं बंद केले. १२ नोव्हेंबर रोजी कॉंग्रेस कार्यकारिणीची दोन ठिकाणी बैठका झाल्या. एक पंतप्रधान निवासस्थानी आणि दुसरी कॉंग्रेसच्या जंतर-मंतर रोड कार्यालयात...तेव्हा कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत इंदिरा गांधी यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यावरून काढून टाकले गेले आणि संसदीय पक्षाला आपला नवीन नेता निवडण्यास सांगितले. यानंतर तातडीने इंदिरा गांधींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची बैठक बोलावली, ज्यात कॉंग्रेसच्या ४२९ पैकी ३१० खासदार सहभागी झाले होते. इंदिरा गांधींजी हकालपट्टी झाल्याने काँग्रेसचे २ गट पडले, आणि इंदिरा गांधींनी काँग्रेस(R) आणि दुसरा पक्ष काँग्रेस(O) बनवला. . काँग्रेस(O)नं पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात अविस्ताव प्रस्ताव आणला, त्यानंतर इंदिराजींनी सीपीआय आणि द्रमुकच्या मदतीने कॉंग्रेसचा अविश्वास प्रस्ताव हाणून पाडलाटॅग्स :इंदिरा गांधीकाँग्रेससोनिया गांधीराहुल गांधीIndira GandhicongressSonia GandhiRahul Gandhi