Opinion Poll 2021 : तामिळनाडूत यूपीए, केरळमध्ये डावे, तर आसाम बंगालच्या जनतेचा असा आहे कल... By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 12:08 AM 2021-03-16T00:08:41+5:30 2021-03-16T15:01:53+5:30
Assembly Election 2021 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे सध्या कोरोनाकाळ असूनही राजकारण तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. दरम्यान, ABP News-CVoter Opinion Poll 2021 मधून पाच राज्यांतील जनतेच्या कलाबाबत आश्चर्यकारक आकडेवारी समोर येत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे सध्या कोरोनाकाळ असूनही राजकारण तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. दरम्यान, ABP News-CVoter Opinion Poll 2021 मधून पाच राज्यांतील जनतेच्या कलाबाबत आश्चर्यकारक आकडेवारी समोर येत आहे.
तामिळनाडू या ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार तामिळाडूमध्ये डीएमके-काँग्रेस ही आघाडी बाजी मारण्याची शक्यता आहे. राज्यातील २३४ जागांपैकी १६१ ते १६९ जागा काँग्रेस, डीएमके या यूपीए आघाडीला मिळतील. तर एनडीएमधील एआयएडीएमके आणि भाजपा आघाडीला ५३ ते ६१ जागा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा इतर पक्षांच्या खात्यात जातील.
पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये भाजपा प्रणित एनडीए बाजी मारताना दिसत आहे. ओपिनियन पोलनुसार येथे एनडीएला १६ ते २० जागा मिळतील, तर यूपीएला १० ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे.
केरळ केरळमध्ये यावेळीही डाव्या पक्षांची आघाडी बाजी मारेल, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवला जात आहे. १४० जागांपैकी ७७ ते ८५ जागा डाव्यांच्या एलडीएफला मिळतील. तर ५४ ते ६२ जागा काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफला मिळतील. तर भाजपाला ० ते २ जागांवर समाधान मानावे लागेल.
आसाम आसाममध्ये यावेळी भाजपा आणि काँग्रेस आघाडीमध्ये अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. आसाममध्ये अटीतटीच्या या लढाईत भाजपा बाजी मारेल असा अंदाज आहे. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला ६४ ते ७२ जागा मिळतील असा अंदाज या ओपिनियन पोलने वर्तवला आहे. तर काँग्रेसच्या आघाडीला ५२ ते ६० जागा मिळतील. इतर पक्षांना ० ते ५ जागांवर समाधान मानावे लागेल.
पश्चिम बंगाल या पाच राज्यांमधील निवडणुकीत सर्वाधिक लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे तृणमूल काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेस-डावी आघाडी असे तीन पक्ष रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्येच होण्याची शक्यता आहे. या लढाईत तृणमूल काँग्रेस १५० ते १६६ जागा जिंकत बाजी मारण्याची शक्यता आहे. तर भाजपाला ९८ ते ११४ जागा मिळू शकतात. काँग्रेस-डाव्या आघाडीला २३ ते ३१ जागांवर तर इतरांना ३ ते ५ जागांवर समाधान मानावे लागू शकते.