Lok Sabha Election 2019 Rahul Run, Modi Run Online games
Lok Sabha Election 2019 : ‘राहुल रन’, ‘मोदी व्हर्सेस केजरी’ मोबाईल गेम्सचा धुमाकूळ By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 03:46 PM2019-04-22T15:46:37+5:302019-04-22T16:02:00+5:30Join usJoin usNext लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे राजकीय रंग चढू लागले आहे. मोबाईलमधील प्ले-स्टोअर अॅपमध्ये आता ‘मोदी रन’, ‘राहुल रन’, ‘मोदी व्हर्सेस केजरी’ या राजकीय नेत्यांच्या नावाने गेम्सची निर्मिती करण्यात आली आहे. तरुण व नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष विविध कल्पनांचा वापर करीत आहेत. या निवडणुकीत 8 कोटी 40 लाख तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. व्हिडीओ गेम्स आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहेत. या मोबाइल गेम्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीत व्हिडीओ गेम्सची निर्मिती केली आहे. निवडणुकीदरम्यान टू-डी व थ्री-डी ग्राफिक्समध्ये या गेम्सची उपलब्ध आहेत. यातील अनेक गेम्स 2015 पासून प्लेस्टोरमध्ये आहेत मात्र निवडणुकीच्या माहोलमध्ये अपडेट करण्यात आले आहेत. ‘मोदी फॉर इंडिया 2019’ नावाच्या मोदींवर आधारित गेममध्ये आभासी मोदींच्या माध्यमातून येणाऱ्या अनेक संकटावर मात करत मोदी कशाप्रकारे पुढे जात आहे हे दाखवण्यात आले आहे. ‘मोदी रन - 2019’ या गेममध्ये वापरकर्त्याला आभासी कमळाची फुले गेम जिंकण्यासाठी एकत्र करायची असतात. विशेष म्हणजे हे गेम खेळताना नोटाबंदी , राफेल, जीएसटीसारख्या अडचणींपासून स्वत:ला वाचवायचे असते . ‘मोदी वर्सेस केजरी’ या गेममध्ये आभासी जगातील मोदी आणि केजरीवालांमध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी खेळले जाणारे युद्ध दाखवण्यात आले आहे. ‘राहुल रन’ गेममध्ये जिंकण्यासाठी आभासी हाताचे पंजे एकत्र करायचे आहेत.टॅग्स :लोकसभा निवडणूकनरेंद्र मोदीराहुल गांधीअरविंद केजरीवालभाजपाकाँग्रेसLok Sabha Election 2019Narendra ModiRahul GandhiArvind KejriwalBJPcongress